Home /News /sport /

VIDEO : मॅच सुरू असताना अनपेक्षित हल्ला, खेळाडूंना घ्यावा लागला सुरक्षित आसरा!

VIDEO : मॅच सुरू असताना अनपेक्षित हल्ला, खेळाडूंना घ्यावा लागला सुरक्षित आसरा!

वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका (West Indies vs Sri Lanka) यांच्यात रविवारी झालेली तिसरी वन-डे मॅच अचानक थांबवावी लागली.

    मुंबई, 15 मार्च : वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका (West Indies vs Sri Lanka) यांच्यात रविवारी झालेली तिसरी वन-डे मॅच अचानक थांबवावी लागली. सर व्हिव्हियन रिचर्डस स्टेडियम अ‍ॅण्टिग्वा (Sir Vivian Richards Stadium, Antigua) इथे ही मॅच झाली. या मॅचमध्ये यजमान वेस्ट इंडिजने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची बॅटींग सुरू असताना हा सर्व प्रकार घडला. श्रीलंकेच्या इनिंगमधील 38 वी ओव्हर सुरू होती. त्यावेळी अचानक प्रचंड संख्येनं मधमाश्यांनी स्टेडियममध्ये हल्ला (Bee attack in stadium) केला. त्यामुळे या हल्ल्यापासून वाचण्यासाठी दोन्ही बॅट्समन, अंपायर आणि फिल्डिंग करणारे सर्व खेळाडू मैदानावरच आपआपल्या जागी झोपले. मधमाश्यांच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांच्यासमोर हाच एकमेव मार्ग होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. मधमाश्यांच्या हल्ल्याने गाजलेली तिसरी वन-डे वेस्ट इंडिजनं जिंकली. श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटींग करताना 5 आऊट 274 रन केले. 275 रनचं आव्हान वेस्ट इंडिजने पाच विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासोबतच वेस्ट इंडिजने ही मालिका 3-0 अशी जिंकली आहे. ( वाचा : IPL 2021 : इशान आणि सूर्याचा मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सिझन! वाचा काय आहे कारण ) वेस्ट इंडिजकडून डॅरेन ब्राव्होनं सर्वात जास्त 102 रन काढले. ब्राव्होलाच 'मॅच ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याचबरोबर शाही होफ याने 64 तर कॅप्टन कायरन पोलार्डने 53 रन ची खेळी केली. शाही होपने या मालिकेत जबरदस्त प्रदर्शन करत 258 रन काढले. त्यालाच 'मॅन ऑफ द सीरिज' हा पुरस्कार देण्यात आला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bee attack, Cricket, Sports, Sri lanka, West indies

    पुढील बातम्या