• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WI vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने इतिहास घडवला, दिग्गजांच्या यादीत स्थान

WI vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने इतिहास घडवला, दिग्गजांच्या यादीत स्थान

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने (West Indies vs South Africa) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा स्पिनर केशव महाराज (Keshav Maharaj) याने इतिहास घडवला आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 जून : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने (West Indies vs South Africa) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा स्पिनर केशव महाराज (Keshav Maharaj) याने इतिहास घडवला आहे. केशव महाराजने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार हॅट्रिक घेतली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो दुसरा दक्षिण आफ्रिकन खेळाडू ठरला आहे. तसंच तो हा कारनामा करणारा पहिलाच दक्षिण आफ्रिकन स्पिनर ठरला आहे. केशव महाराजने कायरन पॉवेल (Kieron Powell), जेसन होल्डर (Jeson Holder) आणि जोशुआ डिसिल्वा (Joshua De Silva) यांची लागोपाठ तीन बॉलवर विकेट घेतली. वेस्ट इंडिजच्या इनिंगच्या 37 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर महाराजने पॉवेलला माघारी पाठवलं. पॉवेलने महाराजच्या बॉलिंगवर हवेत शॉट मारला, पण लेग साईडला उभ्या असलेल्या नॉर्कियाने हा कॅच पकडला. पॉवेल 51 रन करून आऊट झाला. यानंतर लगेच पुढच्या बॉलवर जेसन होल्डरने शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या कीगन पीटरसनला कॅच दिला. यानंतर जोशुआ डिसिल्वा मैदानात आला. महाराजच्या बॉलिंगवर लेग स्लिपला उभ्या असलेल्या मूल्डरने डिसिल्वाचा अफलातून कॅच पकडला.
  Published by:Shreyas
  First published: