• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WI vs AUS: ब्राव्होच्या फूटबॉल स्किलला एलनची साथ, असा भन्नाट कॅच तुम्ही पाहिलाच नसेल, VIDEO

WI vs AUS: ब्राव्होच्या फूटबॉल स्किलला एलनची साथ, असा भन्नाट कॅच तुम्ही पाहिलाच नसेल, VIDEO

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies vs Australia) 6 विकेटने दणदणीत विजय झाला, याचसोबत विंडीज टीमने 5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 जुलै: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies vs Australia) 6 विकेटने दणदणीत विजय झाला, याचसोबत विंडीज टीमने 5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. या मुकाबल्यात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्येही कॅरेबियन टीम ऑस्ट्रेलियावर भारी पडली. क्रिस गेलने (Chris Gayle) ऑस्ट्रेलियन बॉलर्सची धुलाई केली, त्याआधी वेस्ट इंडिजच्या फिल्डर्सनी ऑस्ट्रेलियन कर्णधार एरॉन फिंच याला आऊट करून आपल्या फिल्डिंगचा स्तर दाखवून दिला. 12 व्या ओव्हरमध्ये हेडन वॉल्शच्या (Hayden Walsh) पाचव्या बॉलवर फिंच डीप मिड-विकेटच्या दिशेने सिक्स मारायला गेला आणि आऊट झाला. वॉल्शच्या बॉलिंगवर मोठा शॉट मारायच्या नादात बॉल हवेत गेला. लॉन्ग ऑन आणि डीप मिड-विकेटवर दोन फिल्डर उभे होते. ड्वॅन ब्राव्हो (Dwyane Bravo) हा कॅच पकडण्यासाठी गेला, पण तेवढ्यात बॉल त्याच्या हातातून सुटला. यानंतर ब्राव्होने बॉल पायाने उडवला, मग फॅबियन एलनने (Fabien Alen) कॅच पकडला.
  View this post on Instagram

  A post shared by Fox Cricket (@foxcricket)

  वेस्ट इंडिजच्या या उत्कृष्ट फिल्डिंगमुळे एरॉन फिंच (Aron Finch) 30 रनवर आऊट झाला. ब्राव्हो आणि एलन यांचा हा कॅच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 141 रन केले. कॅरेबियन टीमने 142 रनच्या आव्हानाचा पाठलाग 31 बॉल शिल्लक असतानाच 4 विकेट गमावून केला. वेस्ट इंडिजकडून गेलने 38 बॉलमध्ये सर्वाधिक 67 रन केले. यामुळे गेलला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय कर्णधार निकोलस पूरन (Nichollas Pooran) 32 रनवर नाबाद राहिला. पूरनने लागोपाठ दोन फोर मारून टीमला विजय मिळवून दिला.
  Published by:Shreyas
  First published: