• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WI vs AUS : ज्याला क्रिकेटचे धडे दिले तोच बॉलर ऑस्ट्रेलियावर उलटला!

WI vs AUS : ज्याला क्रिकेटचे धडे दिले तोच बॉलर ऑस्ट्रेलियावर उलटला!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा (West Indies vs Australia) 56 रननी पराभव झाला. याचसोबत कांगारू टीम 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 ने पिछाडीवर पडली आहे.

 • Share this:
  ग्रॉस आयलेट, 11 जुलै : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा (West Indies vs Australia) 56 रननी पराभव झाला. याचसोबत कांगारू टीम 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 ने पिछाडीवर पडली आहे. वेस्ट इंडिजने पहिले बॅटिंग करत 4 विकेट गमावून 196 रन केले, या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा 140 रनवर ऑल आऊट झाला. लेग स्पिनर हेडन वॉल्शने (Hayden Walsh) 29 रन देऊन 3 विकेट घेतल्या. सीरिजमध्ये वॉल्शनेच सर्वाधिक 6 विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या हेडन वॉल्शचा जन्म अमेरिकेत झाला. 29 वर्षांचा हा बॉलर 2019 साली अमेरिकेकडून ऑस्ट्रेलियाच्या नेट सेशनमध्ये सहभागी झाला होता. हेडन वॉल्श याने या काळात ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेटचे धडे घेतले. यानंतर 2 वर्षातच तो ऑस्ट्रेलियन टीमवरच उलटला. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूने हेडनचा एक व्हिडिओ शेयर केला. यामध्ये हेडनने नेट सेशनदरम्यान काही रंजक गोष्टी सांगितल्या. नेट प्रॅक्टिसनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने हेडन वॉल्शची तुलना राशिद खानसोबत केली होती. हेडन वॉल्शने 2011-2012 साली वेस्ट इंडिजमधूनच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तर 2018 साली त्याने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केलं. ऑक्टोबर 2018 साली आयसीसी वर्ल्ड कप डिव्हिजन मुकाबल्यांमध्ये त्याला अमेरिकन टीममध्ये स्थान मिळालं. याआधी वॉल्श अमेरिकेकडून वनडे आणि टी-20 सामने खेळला आहे. अमेरिका आयससीसीचा असोसिएट सदस्य आहे, त्यामुळे त्याला तिकडे फार संधी मिळत नव्हती. वॉल्श प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजकडून खेळतच होता, त्यामुळे त्याला नोव्हेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिज टीममध्ये अफगाणिस्तानविरुद्ध संधी देण्यात आली. दोन देशांकडून वनडे खेळणारा वॉल्श 14वा खेळाडू बनला. यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच त्याने वेस्ट इंडिजकडून पहिली टी-20 खेळली. दोन देशांकडून टी-20 आंतरराष्ट्रीय खेळणारा वॉल्श 9 वा क्रिकेटपटू ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये वॉल्शने 2 सामन्यांमध्ये 6.50 च्या इकोनॉमी रेटने 52 रन देत 17 विकेट घेतल्या. तर 10 वनडेमध्ये त्याला 10 विकेट घेण्यात यश आलं आहे. टी-20 करियरमध्ये त्याने 40 सामने खेळून 46 विकेट पटकावल्या. वॉल्श कॅनडा टी-20 लीगमध्येही खेळला आहे.
  Published by:Shreyas
  First published: