IPL 2019 : पाच कोटींच्या 'या' खेळाडूला फोडता आला नाही भोपळा

IPL 2019 : पाच कोटींच्या 'या' खेळाडूला फोडता आला नाही भोपळा

बंगळुरू संघाच्या अडचणीत वाढ, केवळ 59 धावांत अर्धा संघ तंबूत.

  • Share this:

चेन्नई, 23 मार्च: आयपीएलच्या 12व्या हंगांमाची दणख्यात सुरूवात झाली असताना, धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत आपल्या फिरकी गोलंदाजांवर विश्वास टाकला. पहिल्या दहा ओव्हर्सआधीच धोनीचा हा विश्वास सार्थकी ठरवत 38 वर्षीय हरभजन सिंगने आपल्या फिरकीच्या जाळ्यात आधी बंगळुरू संघाचा कर्णधार आणि चेन्नईसाठी खतरा असणारा विराट कोहली याला आपल्या जाळ्यात अडकवले. केवळ 6 धावा करत विराट कोहली माघारी परतला, यानंतर भज्जीच्या फिरकीचा शिकार ठरल तो माईन अली. त्यालाही भज्जीने माघारी पाठवले. भज्जीच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरांवर बंगळुरू संघाचे प्रमुख फलंदाज आधीच माघारी परतले. त्यामुळे भज्जीच्या फिरकीचे बंगळुरू संघाला ग्रहण लागले. पण तब्बल पाच कोटींना विकत घेतलेल्या वेस्ट इंडिजच्या तडाखेबाज फलंदाजाने चेन्नईसमोर नांगी टाकत, आपलं खातेही न उघडता माघारी परतला.

वेस्ट इंडिजच्या या फलंदाजाला आयपीएलच्या लिलावात पाच कोटींना खरेदी करण्यात आले होते. मात्र चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या हेटमायरला धोनीने अगदी चपळपणे धावबाद करत माघारी परतवले. हेटमेयर 2014च्या अंडर 19 संघात होता. यावेळी त्याने केलेल्या फलंदाजीच्या जोरावरत वेस्ट इंडिजने हा विश्वचषक जिंकला होता. हेटमेयर आयसीसीच्या पाच उभारत्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळे आयपीएच्या लिलावात त्याच्यावर चांगली बोली लावण्यात आली होती.मात्र शुन्यवर धावबाद झाल्यामुळे विराट कोहली नक्कीच नाराज झाला असणार आहे. मात्र, दुसरीकडे चेपॉकवर राजा सारखा राज्य करणारा चेन्नईचा कर्णधार धोनी मात्र आपल्या गोलंदाजींच्या कामगिरीवर खुश असणार आहे.

धोनीसाठी होम ग्राऊंड लकीच

चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील पहिला सामना चेन्नईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळण्यात येत आहे. या दोन्ही संघांमध्ये चेन्नईमध्ये सात सामने खेळले गेले. या सात सामन्यांपैकी तब्बल सहावेळा चेन्नईने बंगळुरूवर विजय मिळवला आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या चॅलेंजर्सना धोनीच्या किंग्जना घरच्या मैदानावर हरवणे कठीण जाणार आहे.

First published: March 23, 2019, 9:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading