20 लाख सामने, 7 हजार विकेट! अखेर 'या' दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती

20 लाख सामने, 7 हजार विकेट! अखेर 'या' दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती

वेस्ट इंडिजच्या एक दिग्गज खेळाडूनं चक्क वयाच्या 85व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे.

  • Share this:

अँटिगुआ, 27 ऑगस्ट : एकीकडे भारत-वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. तर, दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली आहे. वर्ल्ड कपनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली होती. आता मात्र वेस्ट इंडिजच्या एक दिग्गज खेळाडूनं चक्क वयाच्या 85व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे. सेसिल राईट असे या वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूचे नाव आहे. सेसिल यांनी रिचर्ड रिचर्ड्स, गॅरी सोबर्स आणि फ्रॅंक वॉरेल यांच्यासोबत असंख्य सामने खेळले होते. सेसिल जलद गोलंदाज होते, त्यांना प्रेमानं सेस या नावाने ओळखले जात होते.

सेसिल यांनी नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याची जाहीर केले. त्याचे वय 85 असून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बारबाडोस विरोधात जमैका संघाकडून केली होती. घरेलु क्रिकेटमध्ये तुफान गोलंदाजी केल्याचा फायदा त्यांना झाला. मात्र, 1959मध्ये ते इंग्लंडला निघून गेले. त्यानंतर क्रॉम्पटन येथून त्यांनी सेंट्रल लंकाशायर संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. इंग्लंडमध्येच असताना त्यांचा विवाह झाला.

राईट यांनी रिचर्ड्स आणि जोएल गार्नर यांच्यासोबत असंख्य सामने खेळले होते. त्यांनी 1970 आणि 1980मध्ये वेस्ट इंडिजकडून 60 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. त्यांनी आतापर्यंत 7 हजारहून अधिक विकेट घेतल्या आहेत. तर 20 लाखांहून अधिक सामने खेळले आहेत.

वाचा-मिताली राजचं करिअर संपवणाऱ्या खेळाडूला BCCIने दिली मोठी जबाबदारी!

60 वर्षांनी केली निवृत्तीची घोषणा

सेसिल यांनी अखेर 60 वर्षांच्या क्रिकेट करिअरनंतर आता क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. सेसिल यांनी, आता क्रिकेट खेळणे जमणार नाही असे मानत वय वाढल्यामुळं क्रिकेटमधून संन्सास घेण्याचा निर्णय घेतला. 7 सप्टेंबरला सेसिल निवृत्तीची घोषणा करणार आहेत. दरम्यान आता सेसिल यांना टीव्ही पाहणेही पसंत नसल्याची कबुली दिली. क्रिकेटपेक्षा ते आता फिरण्यावर जास्त भर देतात.

वाचा-DDCAचा मोठा निर्णय, फिरोज शाह कोटला मैदानाचे नाव बदलणार!

VIDEO : माल तोच पॅकजिंग वेगळं, सुप्रिया सुळेंचा गयारामांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 08:25 PM IST

ताज्या बातम्या