'तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव', बेन स्टोक्सच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या खेळाडूनं घेतली निवृत्ती

'तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव', बेन स्टोक्सच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या खेळाडूनं घेतली निवृत्ती

गेल्या काही दिवसांपासून या खेळाडूनं इंग्लंडच्या खेळाडूंच्या पत्नींवर आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : मैदानापेक्षा मैदानाबाहेर जास्त चर्चेत असणाऱ्या वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या खेळाडूनं इंग्लंडच्या खेळाडूंच्या पत्नींवर आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. हा क्रिकेटपटू आहे वेस्ट इंडिजचा (West Indies) क्रिकेटपटू मार्लोन सॅम्युअल्स. सॅम्युअल्सच्या खेळीच्या जोरावर दोनवेळा वेस्ट इंडिजचा संघ टी-20 चॅम्पियन झाला होता. आता सॅम्युअल्सनं क आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले आहेत.

क्रिकेट वेस्‍टइंडीजचे मुख्‍य कार्यकारी जॉनी ग्रेव्हनं सॅम्युअल्सनं निवृत्ती जाहीर केल्याची पुष्टी केली आहे. सॅमुअल्‍सनं वयाच्या 21व्या वर्षी भारतविरुद्ध पहिले कसोटी शतक केले होते. मात्र सध्या सॅम्युअल्स एका वेगळ्या कारणानं चर्चेत आला होता. इंग्लंडचा (England) अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्या पत्नीवर आक्षेपार्ह टिपण्णी केली होती.

वाचा-'इंग्लंडच्या खेळाडूंच्या पत्नी अब्जाधीशांच्या मांडीवर का बसतात?' सॅम्युअल्सनं शेअर केला आक्षेपार्ह VIDEO

सॅम्युअल्सची आंतरराष्ट्रीय कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत सॅम्युअल्सनं 71 कसोटी सामन्यात 32.64च्या सरासरीनं 3 हजार 917 धावा केल्या आहेत. यात 7 शतक आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, 207 एकदिवसीय सामन्यात 32.97च्या सरासरीनं 5 हजार 606 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सॅम्युअल्सच्या नावावर 10 शतक आणि 30 अर्धशतक आहेत. सॅम्युअल्सनं 67 टी-20 सामनेही खेळले आहेत. यात 29.29च्या सरासरीनं 1611 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 41 टेस्‍ट, 89 वनडे आणि 22 टी-20 विकेटही आहेत.

वाचा-नशीबच वाईट! हैदराबाद मुळे नाही तर 'त्या' 9 चेंडूंमुळे IPL बाहेर गेली KKR

काय आहे सॅम्युअल्स-स्टोक्स वाद?

बेन स्टोक्सने एका टेस्ट मॕच स्पेशल पॉडकास्टमध्ये सॅम्युअल्सवर विनोद केला होता. स्टोक्सनं गमतीने म्हटले होते की 14 दिवस क्वारंटाईन होण्याची वेळ माझ्या दुश्मनावरसुध्दा येऊ नये. यावर त्याच्या भावाने विचारले की यात तू मार्लोन सॅम्युअल्सबद्दलही बोलतोय का ? तर बेन स्टोक्स ‘नाही’ असे उत्तरला होता. या खेळाडूंमध्ये 2015 पासून वाद आहे. 2015मध्ये जेव्हा सॅम्युअल्सने ग्रेनेडा कसोटीत स्टोक्सला बाद केले होते आणि त्यानंतर सॕल्यूटची नक्कल करत त्याला चिडवले होते. यानंतर 2016 च्या टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यातही दोघ आमनेसामने आले होते.

Published by: Priyanka Gawde
First published: November 4, 2020, 2:27 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या