VIDEO : गोलंदाज, फलंदाजही शोधू लागले बॉल, हा असा अजब नो-बॉल पाहिलात का?

सध्या आयपीएलमध्ये सर्व संघांमध्ये प्ले ऑफकरिता चुरस पाहायला मिळत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 12:01 AM IST

VIDEO : गोलंदाज, फलंदाजही शोधू लागले बॉल, हा असा अजब नो-बॉल पाहिलात का?

नवी दिल्ली, 20 एप्रिल : सध्या आयपीएलमध्ये सर्व संघांमध्ये प्ले ऑफकरिता चुरस पाहायला मिळत आहे. या सामन्यात दिल्लीनं पाच विकेट राखत विजय मिळवला.

या सामन्यात अनेक मजेशीर प्रसंग घडले. यात गेलला बाद करण्यासाठी इनग्राम आणि अक्सर यांनी मिळून केलेली कसरत पहिल्या डावात पाहायला मिळाली. तर, दुसऱ्या डावात पाहायला मिळाला तो, मुरुगन अश्विनचा अजब नो बॉल.या सामन्याच्या दुसऱ्या डावात सातव्या षटकात मुरुगन अश्विन आपली पहिली ओव्हर टाकत होता. आपल्या फिरकीच्या जोरावर सर्वच फलंदाजांना गार करणाऱ्या या गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर चेंडूही गार झाला. अश्विनच्या हातातून चेंडू निसटला आणि तो थेट क्रिझच्या बाहेर गेला. खुद्द फलंदाज श्रेयस अय्यरलाही कळलं नाही की, चेंडू गेला कुठे. या चेंडूला पंचांनी नो-बॉल घोषित केले. यामुळं दिल्लीच्या संघाला एक धाव आणि एक चेंडू जादा मिळाला. मात्र, प्रेक्षकांमध्ये मात्र हशा पिकला.

Loading...दिल्लीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवत पंजाबला 164 धावांवर रोखलं. तर, 164 धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली फलंदाजी केली. कर्णधारा श्रेयस अय्यरनं दिल्लीला आणखी विजय मिळवून दिली. श्रेयसनं 49 चेंडूत 58 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळं दिल्लीनं शेवटच्या षटकात सामना जिंकला. दरम्यान शिखर धवननं सलामीला आल्यानंतर आक्रमक फलंदाजी केली. मात्र, 56 धावा करत बाद झाला. मात्र, शिखर आणि श्रेयस वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.

सलामीला आलेला पृथ्वी शॉला चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान तोही 13 धावांवर धावबाद झाला. शिखर आणि श्रेयसच्या अर्धशतकी भागीदारीनं दिल्लीला विजयाच्या जवळ नेले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही, खराब शॉट मारत तो बाद झाला. सध्या अंकतालिकेत दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे तर पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

तर, प्रथम फलंदाजी करताना, पंजाबनं राहुल आणि मयंक अग्रवाल झटपट दोन विकेट गमवल्यानंतर, फलंदाजीची धुरा सांभाळली ती, ख्रिस गेलनं. ख्रिस गेलनं एकाकी झुंज देत आपली तुफानी फलंदाजी सुरु केली. केवळ 25 चेंडूत त्यानं आपलं शतक पुर्ण केलं. गेलंन 37 चेंडूत 69 धावा केल्या. तर, तळाला आलेल्या हरप्रीत सिंह आणि आर अश्विन यांनी शेवटच्या दोन आव्होरमध्ये 29 धावा केल्या. दिल्लीकडून संदिपनं 40 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, दिल्लीचा स्टार गोलंदाज रबाडानं 2 विकेट घेतल्या.प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 20, 2019 11:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...