मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: नागपूर टी20 होणार की नाही? पाहा भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी20 आधी Weather Report

Ind vs Aus: नागपूर टी20 होणार की नाही? पाहा भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी20 आधी Weather Report

नागपूरचं व्हीसीए स्टेडियम

नागपूरचं व्हीसीए स्टेडियम

Ind vs Aus: नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरा टी20 सामना होणार आहे. पण त्याआधी या सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

    नागपूर, 23 सप्टेंबर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांची टी20 मालिका सध्या सुरु आहे. मोहालीत झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं 209 धावांचं विशाल लक्ष्य उभारुनही ऑस्ट्रेलियानं 4 विकेट्सनी विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे नागपूरमधली दुसरी लढत टीम इंडियासाठी निर्णायक ठरणार आहे. भारताला या मालिकेतलं आव्हान राखायचं असेल तर जिंकणं गरजेचं आहे. नागपूरच्या जामठामधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पण त्याआधी या सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नागपुरात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माहितीनुसार आज संध्याकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेले काही दिवस संध्याकाळच्या वेळेत नियमितपणे नागपुरात पावसानं हजेरी लावली आहे. आजही संध्याकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर खेळ झाल्यास कमी ओव्हर्सचा सामनाही होऊ शकतो. हेही वाचा - ... तोपर्यंत रिटायर होणार नाही, फुटबॉल फॅन्सना रोनाल्डोने दिली गूड न्यूज! बुमराचं कमबॅक पक्कं भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी गोलंदाजीत मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टी20त 208 धावांचा डोंगर उभारुनही भारतीय संघावर पराभवाची नामुष्की आली होती. त्यामुळे रोहित शर्मा त्याचा हुकमी एक्का आज वापरणार हे त्यानं मोहालीतच सांगितलं होतं. आशिया कपआधी झालेल्या दुखापतीतून सावरलेला जसप्रीत बुमरा पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. मोहालीतल्या पहिल्या सामन्यात बुमराला विश्रांती देण्यात आली होती. भारत वि. ऑस्ट्रेलिया विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर संध्याकाळी 7.00 वाजता स्टार स्पोर्टस आणि हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेट कीपर), दिनेश कार्तिक (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.  ऑस्ट्रेलियन संघ- अॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झॅम्पा.
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Cricket news, India vs Australia, Sports, Team india, Weather update

    पुढील बातम्या