मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ: टी20त पावसाचा धुमाकूळ, पण भारत-न्यूझीलंड वन डेतही तेच होणार? पाहा Weather Report

Ind vs NZ: टी20त पावसाचा धुमाकूळ, पण भारत-न्यूझीलंड वन डेतही तेच होणार? पाहा Weather Report

भारत-न्यूझीलंड वन डेदरम्यान कसं असेल हवामान?

भारत-न्यूझीलंड वन डेदरम्यान कसं असेल हवामान?

Ind vs NZ: भारत आणि न्यूझीलंड संघातला पहिला वन डे सामना शुक्रवारी सकाळी ऑकलंडमध्ये होणार आहे. स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑकलंडमध्ये शुक्रवारी हवामान स्वच्छ असणार आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

ऑकलंड, 24 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपनंतर अवघ्या पाच दिवसात भारताचा न्यूझीलंड दौरा सुरु झाला. पण या दौऱ्यातल्या टी20 मालिकेत न्यूझीलंडमधल्या खराब वातावरणाचा दोन्ही संघांना चांगलाच फटका बसला. या मालिकेत केवळ एकच सामना पूर्ण होऊ शकला. वेलिंग्टनचा पहिला सामना पावसामुळे एकाही बॉलचा खेळ न होता रद्द करण्यात आला. तर नेपियरच्या तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला. अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार तो टाय अवस्थेत संपला आणि ही मालिका भारतानं 1-0 अशा फरकानं खिशात घातली. आता शुक्रवारपासून उभय संघात वन डे मालिका सुरु होणार आहे. पण याही मालिकेत पावसाचा व्यत्यय येणार का?

ऑकलंडमध्येही पाऊस? 

भारत आणि न्यूझीलंड संघातला पहिला वन डे सामना शुक्रवारी सकाळी ऑकलंडमध्ये होणार आहे. स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑकलंडमध्ये शुक्रवारी हवामान स्वच्छ असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सामन्याचा पूर्ण आनंद लुटता येणार आहे. टी20 मालिकेदरम्यान चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. पण वन डेत मात्र पूर्ण ओव्हर्सचा खेळ अपेक्षित आहे.

हेही वाचा - Team India: वर्ल्ड कपमधला पराभव जिव्हारी, टीम इंडियाचा 'हा' खेळाडू होतोय रिटायर्ड? Video तून दिले संकेत

शिखर धवनची टीम इंडिया सज्ज

न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचं वन डे रेकॉर्ड तितकंसं खास नाही. गेल्या 5 पैकी केवळ एकच वन डे मॅच न्यूझीलंडमध्ये भारताला जिंकता आली आहे. त्यामुळे धवनची टीम इंडिया न्यूझीलंडला वन डे मालिकेत टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.

भारत वि. न्यूझीलंड

पहिली वन डे, इडन पार्क, ऑकलंड

भारतीय वेळेनुसार सकाळी 7.00 वाजता

अॅमेझॉन प्राईमवर थेट प्रक्षेपण

भारताचा वन डे संघ -  शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सेन, अर्शदीप,  शार्दूल ठाकूर, दीपक चहर.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, Team india, Weather update