मोहाली, 17 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) हे दोन्ही संघ टी-20 वर्ल्ड कपच्याआधी तयारीसाठी सज्ज आहेत. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन टी-20 सामन्यांसाठी भारतात आला आहे. मात्र, या दोन्ही संघांमध्ये धर्मशाला येथे आयोजित करण्यात आलेला पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. त्यामुळं 18 सप्टेंबरला दुसरा सामना मोहाली येथे होणार आहे. धर्मशाला येथे पावसामुळं टॉस न होता सामना रद्द झाला. त्यामुळं आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे ते मोहाली येथील वातावरणावर.
धर्मशाला येथील पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द झाल्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयची शाळा घेतली होती. पावसाच्या दिवसात बीसीसीआयनं भारतात सामने ठेवल्यामुळं नाराजी व्यक्त केली होती. मोहालीमध्ये वेगळी परिस्थिती पाहायला मिळू शकते. त्यामुळं चाहत्यांचे लक्ष मोहालीच्या हवामानावर आहे. (Mohali Weather Report)
चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा काढणार वचपा
तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.
असे असेल मोहालीचे हवामान
धर्मशालामध्ये निराशा मिळाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष मोहालीच्या हवामानावर आहे. दरम्यान चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 18 सप्टेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसाची कोणतीही शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली नाही. हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल. त्यावेळी मोहालीचे तापमान 28 ते 31 डिग्री असू शकते. दरम्यान मॅच सुरू असताना साडे आठ वाजण्याच्या सुमारास 5 टक्के किंवा 10 टक्के पावसाची शक्यता आहे.
असा आहे भारत-दक्षिण आफ्रिका दौरा
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. यात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-20 आणि तीन कसोटी सामना खेळण्यात येणार आहेत. दुसरा टी-20 सामना 18 सप्टेंबरला मोहालीला तर, तिसरा कसोटी सामना 22 सप्टेंबरला बंगळूरू येथे होणार आहे. दरम्यान कसोटी दौरा 2 ऑक्टोबरपासून विशाखापट्टनम येथून सुरू होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबरला पुणे येथे आणि अखेरचा कसोटी सामना 19 ऑक्टोबरला रांची येथे होणार आहे.
टी-20साठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.
VIDEO: सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा