मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs SA: गुवाहाटीत पुन्हा होणार पावसाचा खेळ? पाहा दुसऱ्या टी20 आधी Weather Report

Ind vs SA: गुवाहाटीत पुन्हा होणार पावसाचा खेळ? पाहा दुसऱ्या टी20 आधी Weather Report

भारत-दक्षिण आफ्रिका टी20त पावसाचा खेळ?

भारत-दक्षिण आफ्रिका टी20त पावसाचा खेळ?

Ind vs SA: भारतीय संघ दोन वर्षांनी गुवाहाटीत टी20 सामना खेळत आहे. याआधी 2020 साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला होता. त्यामुळे तो सामना एकही बॉल न खेळताच रद्द झाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

गुवाहाटी, 02 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला दुसरा टी20 सामना आज गुवाहाटीत खेळवण्यात येत आहे. भारतानं तिरुअनंतपूरमची पहिली टी20 जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे गुवाहाटीतली टी20 जिंकून मालिका खिशात घालण्याच्या निर्धारानं भारतीय संघ आज गुवाहाटीच्या मैदानात उतरेल. पण भारतीय संघाचे हे मनसुबे उधळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुवाहाटीत आज रात्री पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुवाहाटीत पावसाचा खेळ?

भारतीय संघ दोन वर्षांनी गुवाहाटीत टी20 सामना खेळत आहे. याआधी 2020 साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला होता. त्यामुळे तो सामना एकही बॉल न खेळताच रद्द झाला होता. त्यामुळे आज गुवाहाटीत पुन्हा पावसामुळे खेळ बिघडून नये अशी अपेक्षा क्रिकेट चाहते करत आहेत. पण हवामान खात्यानं  वर्तवलेल्या अंदाजानुसार रात्री पाऊस पडण्याची जास्त चिन्ह आहेत.

स्टेडियममध्ये आधीच तयारी

पाऊस पडून गेला तरी खेळ सुरु करण्यासाठी यावेळी आसाम क्रिकेट असोसिएशननं खास तयारी केली आहे. 2020 साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी ओली असल्यानं सामना होऊ शकला नाही. त्यावेळी पीच सुकवण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. पण अखेरीस सामना रद्द करावा लागला. त्यामुळे यावेळी मात्र आयोजकांनी चांगलीच खबरदारी घेतली आहे.

हेही वाचा - Road Safaty World Series: ट्रॉफी जिंकताच सचिननं 'या' दोघांसोबत केलं खास सेलिब्रेशन, पाहा Video

टीम इंडियाची नजर मालिकाविजयावर

टीम इंडियानं जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा आजचा सामना जिंकला तर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर मायदेशात मिळवलेला  हा पहिलाच मालिकाविजय असेल. कारण दक्षिण आफ्रिकेनं भारतात एकही मालिका गमावलेली नाही. 2015-16 साली दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या तीन मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं एक जिंकली आहे तर दोन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

भारत वि. दक्षिण आफ्रिका, दुसरी टी20

बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

2 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.00 वाजता

स्टार स्पोर्टस, डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण

भारतीय टी20 संघ –रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिकेचा टी20 संघ - तेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हँड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉकिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, रिले रुसो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, ब्यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन आणि एंडिल फेहलुकवायो

First published:
top videos

    Tags: Sports, T20 cricket, T20 world cup 2022, Team india, Weather forecast