मुंबई, 25 डिसेंबर : पाकिस्तानचा (Pakistan) फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) त्यांच्याच देशातील खेळाडूंवर टीका करण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. पाकिस्तानी खेळाडूंना सतत सल्ले देणाऱ्या शोएबचं भारताबद्दलचं मतही चांगलं नाही. त्याचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल (Viral) झाला असून त्यात त्याने ‘गझवा-ए-हिंद’ ची (Ghazwa-e-Hind) भाषा केली आहे. आम्ही आधी काश्मीर (Kashmir) जिंकू आणि नंतर भारतावर हल्ला करु अशी स्वप्न त्याने या व्हिडीओत रंगवली आहेत. जगातील अनेक विषयांवर यु ट्यूबच्या माध्यमातून भाषणबाजी करणाऱ्या शोएबचं शेपूट हे वाकडंच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
काय म्हणाला शोएब?
जावेद मियांदाद (Javed Miandad), शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) हे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू भारताविरुद्ध सतत बरळत असतात. या यादीमध्ये आता शोएबचीही भर पडली आहे. शोएबनं ‘समा टीव्ही’ ला दिलेला हा जुना इंटरव्ह्यू आहे, अशी माहिती आहे. यामध्ये शोएब भारताविरुद्ध ‘गझवा-ए-हिंद’ म्हणजेच पवित्र युद्ध करण्याची भाषा करत आहे.
काय म्हणाला शोएब?
शोएबचा भारताविरुद्ध बोलताना पूर्ण तोल सुटला होता. “आमच्या पवित्र पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे गझवा-ए-हिंद लवकरच तयार होईल. अफगाणिस्तानमधून सेना अटकेपर्यंत जाईल. अटकेच्या नदीचं पाणी दोनदा लाल होईल. उझबेकिस्तानमधून वेगवेगळ्या तुकड्या आम्हाला दाखल होतील. त्याचबरोबर आम्ही काश्मीर ताब्यात घेऊ आणि भारतावर हल्ला करु,’’ अशी बडबड देखील शोएबनं या व्हिडीओत केली आहे. शोएबच्या या बडबडीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
"Ghazwa e Hind is mentioned in our sacred books. We will first capture Kashmir and then invade India from all sides for Ghazwa e Hind"
- Shoaib Akhtar (descendant of a Hindu Gujjar)
After all cricket & art have no boundaries. After Ghazwa e Hind, India will have no boundaries! pic.twitter.com/sRlYml6xow
— Pakistan Untold (@pakistan_untold) December 18, 2020
वादग्रस्त शोएब
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना त्यांच्या प्रचारासाठी ‘गझवा-ए-हिंद’ या उर्दू शब्दाचा वारंवार उल्लेख करतात. पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना भारताविरुद्ध भडकवण्यासाठी त्यांच्याकडून या शब्दाचा वापर केला जातो. शोएबनं देखील तोच शब्द वापरला आहे.
शोएब अख्तरनं काही दिवसांपूर्वी ,'अधिक वेगानं बॉलिंग करण्यासाठी आपल्यावर ड्रग्ज घेण्याची बळजबरी करण्यात आली होती, असा आरोप केला होता. ‘मी या बळजबरीला बळी पडलो नाही,’ असा दावाही शोएबने सांगितले होते.