Home /News /sport /

टी-20 वर्ल्ड कपवरून कॅप्टन कोहलीच्याच विरोधात उतरला रोहित शर्मा!

टी-20 वर्ल्ड कपवरून कॅप्टन कोहलीच्याच विरोधात उतरला रोहित शर्मा!

या कारणामुळं पुन्हा एकदा भिडले रोहित आणि विराट.

    नवी दिल्ली, 09 जानेवारी : यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबरमध्ये टी -20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळं सर्वांच्या नजरा या भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे आहे. याआधी विराटनं संघात बदल होणार नसल्याचे संकेत दिले होते. आता यावर भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानेही आपले मत व्यक्त केले आहे. टी -20 विश्वचषक संघात अद्याप बरीच जागा भरली गेल्याचे त्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याचे मत संघाचा कर्णधार विराट कोहलीपेक्षा काहीसे वेगळे आहे. टी-20 वर्ल्ड कप संघात बऱ्याच खेळाडूंना जागा टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा 2007 मध्ये टी -20 विश्वचषक जिंकणार्‍या संघात होता. अशा स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे त्याला माहित आहे. टी -20 वर्ल्ड कप चॅलेंजवर रोहितनं, 'वर्ल्ड कपमध्ये अजून बराच वेळ बाकी आहे. आम्ही यासाठी तयारी करीत आहोत. अनेक खेळाडू यासाठी तयारी करत आहेत. याचा अर्थ असा आहे की संघात अद्याप जागा आहेत. सध्या आमच्याकडे 15-20 खेळाडू आहेत ते उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या परिस्थितीनुसार संघाची निवड केली जाईल’, असे मत व्यक्त केले. वाचा-जंटलमन गेमला डाग! बाद होईना म्हणून यष्टीरक्षकाने फलंदाजालाच दिल्या शिव्या, VIDEO विराट कोहलीनं मांडले होते वेगळे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने याआधी असे संकेत दिले होते की वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांचे स्थान टी-20 वर्ल्ड कपसाठी निश्चित आहे. त्यामुळं विराटच्या मते वर्ल्ड कप संघात केवळ एका खेळाडूची जागा शिल्लक होती. मात्र आता रोहितनं विराटच्या या मताला खोडून काढत संघात खेळाडूंसाठी जागा आहे, असे म्हटले आहे. वाचा-भारतीय संघाला धक्का, दुखापतीमुळे मुंबईकर खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर या खेळाडूंची जागा निश्चित विराट कोहलीच्या वक्तव्यानंतर टी -20 वर्ल्ड संघात कोणताही धक्कादायक चेहरे सामील होणार नाही असा विश्वास होता. मात्र रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर कोणाला संघात जागा मिळणार याबाबत संभ्रम आहे. असे असले तरी, विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे,ऋषभ पंत, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या या खेळाडूंची जागा निश्चित आहे. अशा परिस्थितीत दोन खेळाडू बाकी आहेत, त्यातील एक वेगवान गोलंदाज आणि दुसरा अष्टपैलू असू शकतो. वाचा-वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 'सरप्राइज पॅकेज' खेळाडू, विराटने सांगितलं नाव
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या