‘आम्ही अणुबॉम्ब वापरू, भारताला एका फटक्यात साफ करू’; माजी पाक खेळाडू बरळला

शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर, सरफराज अहमद यांच्यानंतर आता आणखी एक पाक खेळाडू बरळला.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 08:14 PM IST

‘आम्ही अणुबॉम्ब वापरू, भारताला एका फटक्यात साफ करू’; माजी पाक खेळाडू बरळला

कराची, 20 ऑगस्ट : भारतानं काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय पाकिस्तानच्या पचनी पडला नाही. भारताच्या निर्णयानं जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेशांत विभागलं आहे. यामुळं काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान ते तिथले क्रिकेटपटू सर्वांनीच यावर प्रतिक्रिया दिली. याआधी शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर, सरफराज अहमद यांनी मुक्तफळे उधाळल्यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यानं काश्मीर मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

कलम 370 हटवल्यानंतर थरकाप उडालेल्या पाकिस्ताननं स्वत:चा वकिली करण्यात सुरुवात केली आहे. यात मियादांदने तर, आम्ही सर्व हद्दी पार करून भारतावर हल्ला करू अशी पोकळ धमकी दिली आहे. एका पाकिस्तानी चॅनलशी बोलचाना मियादांदनं हे मत व्यक्त केले. तसेच, भारत हा भित्रा देश आहे, त्यांना घाबरण्याची गरज नाही असे सांगितले.

जावेद मियांदादची मुक्ताफळे

पाकिस्तानी चॅनलनं काश्मीर मुद्द्यावर प्रश्न विचारले असता, “तुमच्याकडे जर सामग्री आहे तर, तुम्ही हल्ला केला पाहिजे. प्रत्येकवेळी नियम तुमच्या मदतीला येणार नाही. जेव्हा त्यांचे शव घरी जातील, तेव्हा त्यांना अक्कल येईल”, अशी मुक्ताफळे उधळली. तसेच, जेव्हा मियादांद यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सल्ला देणार असे विचारले असता, “मी आधीही सांगितले आहे, भारत एक भित्रा देश आहे. त्यांनी आतापर्यंत केले काय आहे. अणुअस्त्र आम्ही असेच नाही ठेवले आहेत. एक संधी आणि भारत पूर्ण साफ करून देईल”, असे भडकाऊ विधान केले आहे.

Loading...

 

View this post on Instagram

 

Legendary batsman Javed Miandad speaks about ongoing issue of Kashmir and India. #Cricket #Pakistan #Karachi #Lahore #Kashmir #KashmirUnderThreat #KashmirHamaraHai #India #JavedMiandad

A post shared by Khel Shel (@khelshel) on

पाकिस्तान खेळाडूंचे वादग्रस्त विधान

जावेद मियादांद यांच्या आधी पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकरणी लक्ष घालावं असं म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सर्फराज अहमदनेही प्रतिक्रिया दिली होती. ईद साजरी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सर्फराज म्हणाला की, मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की या कठीण काळात आमच्या काश्मीरी बांधवांची मदत कर. तर, रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनंही यावरून ट्वीट केलं आहे. त्यानं दुखापत झालेल्या लहान मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानं म्हटंल आहे की, बलिदानाचा अर्थ तुम्ही सांगितलात, तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणत त्यानं ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 09:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...