S M L

...तर आम्ही जिंकण्यासाठी लायक नाही, केकेआरकडून पराभवानंतर विराट संतापला

रॉयल चॅलेंजरला कोलकाताच्या क्रिस लिनची धुंवाधार फलंदाजी भारी पडली, आणि याच्याच जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सहा गडी राखून सामना जिंकला.

Sachin Salve | Updated On: Apr 30, 2018 06:00 PM IST

...तर आम्ही जिंकण्यासाठी लायक नाही, केकेआरकडून पराभवानंतर विराट संतापला

30 एप्रिल : आयपीएलच्या २९व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससोबत रॉयल चॅलेंजर संघाला सलग ५ व्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकात्या विरोधात १७६ धाव करून सुद्धा रॉयल चॅलेंजरला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापला.

रॉयल चॅलेंजरला कोलकाताच्या क्रिस लिनची धुंवाधार फलंदाजी भारी पडली, आणि याच्याच जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सहा गडी राखून सामना जिंकला.


सामान संपल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, "या खेळपट्टीचा अंदाज नाही आला, मला असं वाटलं की, १६५ धावा जरी आम्ही केल्या तर आम्ही हा सामना जिंकू पण १७६ धावा काढून सुद्धा आम्ही हरलो. यासाठी आमची संघीय कामगिरी कमी पडली आहे जर असंच खेळत राहिलो तर जिंकणे अवघड आहे. सर्व 11 खेळाडूंना सोबत घेऊन चांगली कामगिरी करावी लागणार आहे. जर अशीच फिल्डिंग केली तर आम्ही जिंकण्यासाठी लायक नाही."

विशेषतःहा आम्हाला आमच्या फिल्डिंगवर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. या सामन्यात आम्ही खूप चुका केल्या आहेत. आता आम्ही फिल्डिंगमध्ये सुधार करणार आहोत. आम्हाला आता सलग ७ मधील ६ सामने जिंकावे लागणार आहेत.

Loading...
Loading...

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आता प्रत्येक सामना हा आमच्यासाठी सेमी फायनल असल्यासारखा आहे. आम्ही हे करून दाखवणार आहोत आणि सोबतच आमच्या संघीय कामगिरीत सुधारणा करणार आहोत असंही विराट म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 06:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close