मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा, धोनी आणि माझ्यामुळे वाचलं Virat Kohliच टेस्ट करिअर

वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा, धोनी आणि माझ्यामुळे वाचलं Virat Kohliच टेस्ट करिअर

virender sehwag

virender sehwag

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे.

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर:  विराट कोहली (Virat Kohli) हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. टीम इंडियाचा कॅप्टन असलेला विराट भारतीय बॅटिंग लाइन अपचा मुख्य आधार आहे. कॅप्टन म्हणूनही त्याची कामगिरी उत्तम आहे. राइट हॅन्ड बॅट्समन (right hand batsman) असलेल्या विराट कोहलीनं आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. आता टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट बॅट्समन असलेल्या कोहलीच्या टेस्ट करियरची सुरुवात मात्र, फारशी चांगली झाली नव्हती. 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून त्यांनं पदार्पण केलं होतं. कारकिर्दीतील पहिल्या टेस्ट सीरिजमधील तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ 76 रन्स केल्यामुळे त्याला टेस्ट टीममधून वगळण्यात आलं होतं. नंतर स्क्वॉडमध्ये परतल्यानंतरही त्याला बराचसा वेळ बेंचवर बसून काढावा लागला होता. याबाबत वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) मोठा खुलासा केला आहे.

2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या वीरेंद्र सेहवागनं 2016 मध्ये भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजदरम्यान कॉमेंट्री करत असताना विराट कोहलीच्या टेस्ट करियरच्या (Test Career) सुरुवातीबाबत एक किस्सा सांगितला होता. 2011च्या अखेरीस विराट कोहलीनं वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवलं होतं. त्यानंतर एकदा तो ऑस्ट्रेलियाला दौऱ्यावरदेखील गेला होता. इतर अनेक भारतीय बॅट्समनप्रमाणेच त्यानंही तिथे संघर्ष केला. तिसर्‍या टेस्टच्या अगोदर मधल्या फळीमध्ये बॅटिंग करणाऱ्या कोहलीला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत होतं. मात्र, तत्कालीन कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि व्हाईस कॅप्टन वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनी कोहलीवर विश्वास दाखवला आणि त्याला टीममध्ये ठेवण्यात आलं.

भारताचा माजी ओपनर असलेल्या सेहवागनं खुलासा केला की, टीम मॅनेजमेंट विराट कोहलीला टीममधून वगळण्याचा विचार करत होतं. मात्र, सेहवाग आणि धोनीनं विराटचं समर्थन केलं. '2011मध्ये पर्थ टेस्टसाठी टीम मॅनेजमेंट विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला खेळवण्याचा विचार करत होतं. मी व्हाईस कॅप्टन होतो आणि महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होता. आम्ही दोघांनी कोहलीला पाठिंबा दिला. कोहलीनं मिळालेल्या संधीचं पुढे काय केलं हे तुम्हाला माहितीचं आहे, असं सेहवाग म्हणाला होता.

धोनी आणि सेहवागचा त्यावेळी मिळालेला पाठिंबा हा विराट कोहलीच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला. त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून त्याला पुन्हा एकदाही वगळण्यात आलं नाही. पर्थ टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कोहलीनं 44 रन्स केल्या आणि नंतर 75 रन्स केल्या होत्या. मात्र, भारतानं ही मॅच एक इनिंग आणि 37 धावांनी गमावली होती.

दिल्लीकर असलेल्या विराट कोहलीनं चौथ्या टेस्टमध्ये शतक झळकावलं होतं. त्या संपूर्ण टेस्ट सीरिजमध्ये तीन आकडी धावसंख्या गाठणारा तो एकमेव भारतीय बॅट्समन ठरला होता. नंतर झालेल्या ट्राय सीरिजमध्ये त्यानं आपला फॉर्म कायम ठेवला व 8 वन-डे मॅचेसमध्ये 373 रन्स केले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आशिया कप स्पर्धेसाठी त्याला वन-डे टीमचा व्हाईस कॅप्टन करण्यात आलं.

नंतर कोहलीनं पुन्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. तिसऱ्या टेस्ट मॅचनंतर, धोनीनं अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं कोहलीला कॅप्टन बनवण्यात आलं. त्यानं यशस्वीपणे भारतीय टेस्ट टीमचं नेतृत्व केलं. 38 विजयांसह कोहली हा सध्याचा सर्वात यशस्वी भारतीय टेस्ट कॅप्टन आहे. याशिवाय त्यानं 96 टेस्टमध्ये 51.08 च्या सरासरीनं 7 हजार 765 रन्स केले आहेत. विराट कोहलीनं नुकतंच भारतीय टी-20 टीमचं कॅप्टनपद सोडलं आहे. मात्र, निवृत्तीपर्यंत तो टेस्ट टीमचं नेतृत्व करेल अशी शक्यता आहे.

First published:

Tags: Team india, Virat kohli, Virender sehwag