FIFA WC 2018 : फिफामध्ये आजपासून रंगणार नॉक आऊटचा थरार!

FIFA WC 2018 : फिफामध्ये आजपासून रंगणार नॉक आऊटचा थरार!

नॉकआऊटच्या पहिल्याच दिवशी अर्जेंटिना विरूद्ध फ्रान्स आणि पोर्तुगाल विरूद्ध उरूग्वे या तुल्यबळ संघांमध्ये लढत होणार आहे.

  • Share this:

रशिया, 30 जून : फिफा वर्ल्डकपच्या नॉकआऊट राऊंडला आजपासून सुरूवात होतेय. साखळी सामन्यानंतर अंतिम सोळा संघामध्ये नॉकआऊटचा थरार रंगणार आहे. नॉकआऊटच्या पहिल्याच दिवशी अर्जेंटिना विरूद्ध फ्रान्स आणि पोर्तुगाल विरूद्ध उरूग्वे या तुल्यबळ संघांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस पोर्तुगालच्या क्रिस्तीयानो रोनाल्डो आणि अर्जेंटीनाच्या लियोनेल मेसीच्या चाहत्यांसाठी खरी पर्वणी ठरणार आहे.

हेही वाचा

मुंबईत ट्रक आणि कारचा अपघात, 2 जण ठार

मुंबई पोलीस आयुक्तपदी कुणाची वर्णी, मुख्यमंत्री कुणाला देणार पसंती ?

स्विस बँकेत 'तो' काळा पैसा नाही-अरुण जेटली

सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मेसीकडून चाहत्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. नायजेरियाविरुद्ध त्याने यंदाच्या विश्वचषकातील वैयक्तिक पहिला गोल करून सूर गवसल्याचेही संकेत दिले आहेत. क्रोएशियाकडून ०-३ असा पराभव पत्करल्यावर या संघाला खडबडून जाग आली. आक्रमणात प्रामुख्याने मेसीवरच अवलंबून असलेल्या अर्जेटिनाला गोन्झालो हिगुएन आणि सर्जिओ अग्युरो यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. तसेच मागील लढतीत चमकलेला मार्कोस रोजोवरही चाहत्यांचे लक्ष आहे.

First published: June 30, 2018, 10:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading