पॉर्न बघितल्यामुळं होतं पर्यावरणाचं नुकसान, संशोधकांचा दावा!

पॉर्न बघितल्यामुळं होतं पर्यावरणाचं नुकसान, संशोधकांचा दावा!

बेल्जियमसारखा एक देश जितकं पर्यावरणाचं नुकसान करतो तेवढं जगभरात पॉर्न पाहिल्यानं होतं असं संशोधकांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जुलै : पॉर्न बघितल्यानं पर्यावरणाचं नुकसान होतं असं सांगितलं तर तुम्हाला वेड्यात काढतील. पण आता एका रिपोर्टनुसार बेल्जियमसारख्या देशात जितका कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित केला जातो तेवढा कार्बन पॉर्नोग्राफीच्या लाइव्ह स्ट्रीमिंगमुळे उत्सर्जित होतो. संशोधनानुसार ऑनलाइन व्हिडिओमुळं दरवर्षी जवळपास 30 कोटी टन कार्बनचे उत्सर्जन होते. यात एक तृतियांश पॉर्नोग्राफी कंटेट कारणीभूत ठरतो.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे एकूण 4 टक्के ग्रीनहाउस इतका गॅस बाहेर फेकला जातो. 2025 पर्यंत हे प्रमाण 8 टक्क्यांपर्यंत वाढू शकतं. संशोधकांनी ऑनलाइन व्हिडिओला फोन, टीव्ही आणि इतर डिव्हाइसपर्यंत पोहचण्यासाठी लागणारी वीज आणि त्यातून उत्सर्जन होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडची माहिती गोळा केली.

संशोधन करणाऱ्या कम्प्युटर मॉडेलिंगच्या तज्ज्ञांनी असा शोध लावला की, डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे होणाऱ्या एनर्जी कंजंप्शनमध्ये वर्षाला 9 टक्के वाढ झाली आहे. जगभरात डेटा फ्लोमध्ये 60 टक्के प्रमाण व्हिडिओचे आहे. यात समाविष्ट असलेल्या व्हिडिओमध्ये Skype आणि इतर व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसेस वेगळ्या ठेवण्यात आल्या होत्या. हेसुद्धा ड़ेटा फ्लोमध्ये धरलं असतं तर 60 टक्क्यांवरून 80 टक्क्यांवर पोहचलं असतं.

संशोधनानुसार हाय क्वालिटी रिझोल्यूशनच्या व्हिडिओमुळे कार्बन उत्सर्जित होण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त आहे. व्हिडिओ लाइव्ह स्ट्रीमिंग होण्यामुळं कार्बन उत्सर्जन करण्यासाठी संशोधकांनी काही उपाय सुचवले आहेत. यात म्हटलं आहे की, ऑटो प्ले ऑप्शन बंद करायला हवा. जेव्हा गरज असेल तेव्हाच हाय रिझोल्यूशन व्हिडिओ बघा. यासाठी योग्य नियम तयार करण्याची गरज आहे. संशोधकांनी संपूर्ण जगात व्हिडिओ ट्राफीक पाहण्यासाठी सिस्को आणि सॅनव्हाइन मार्फत करण्यात आलेल्या 2018 च्या एका अहवालाचा आधार घेतला.

सेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO

First published: July 15, 2019, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading