मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /VIDEO: रवींद्र जडेजावरही चढला ‘Pushpa’ चित्रपटाचा फिव्हर, अल्लू अर्जुनने दिली खास कमेंट

VIDEO: रवींद्र जडेजावरही चढला ‘Pushpa’ चित्रपटाचा फिव्हर, अल्लू अर्जुनने दिली खास कमेंट

Ravindra Jadeja

Ravindra Jadeja

अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) फेम 'पुष्पा: द राइज- 1' चित्रपटाचा फिव्हर टीम इंडियातही पाहायला मिळाला.

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिकेत असणारा 'पुष्पा: द राइज- 1 (Pushpa: The Rise) हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. सुरुवाती पासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. या चित्रपटाने अनेकांना वेड लावले आहे. विशेष बाब म्हणचे, या चित्रपटाचा फिव्हर टीम इंडियातही पाहायला मिळाला. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्याला पुष्पा चित्रपटाचा फिव्हर चढला असल्याचे पाहायला मिळत आहे.

रवींद्र जडेजाने ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉगवर एक खास इंस्टाग्राम रिल तयार केली आहे. व्हिडीओमध्ये जडेजा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा डायलॉग मारताना दिसत आहे. त्याची ही रील चाहत्यांच्या पसंतीस चांगलीच उतरली आहे. या रिलवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

जडेजाच्या रिलवर चाहत्यांसोबत स्वतः अल्लू अर्जुनने देखील कमेंट केली आहे. अल्लू अर्जुनने या रिलवर तीन इमोजी कमेंट केल्या आहेत. जडेजाने देखील अलू अर्जुनच्या या कमेंटला रिप्लायही दिला आहे.

तसेच, भारतीय संघातील सहकारी कुलदीप यादवने देखील खास कमेंट करत “पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहोत” असे म्हटले आहे. त्याच्या या कमेंटवर रिप्लाय देत होय शुटिंग एनसीएमध्ये होईल. असे गंमतीने म्हटले आहे.

जडेजा दुखापतग्रस्त असल्याने तो आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. विश्रांतीच्या काळात जडेजा सोशल मीडियावर हटके पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.

First published:

Tags: Allu arjun, Ravindra jadeja