कार्डिफ, 1 जून : वर्ल्ड कपमधील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डावाच्या सुरुवातीलाच मॅट हेनरीच्या गोलंदाजीवर लंकेचा लाहिरू थिरिमाने पायचित झाला. यावेळी पंचांनी पायचितचे अपिल फेटाळून लावल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने डीआरएस घेतला. त्यानंतर पंचांना निर्णय बदलून तिसऱ्या पंचांनी लाहिरूला बाद दिले.
आय़सीसीने थर्ड अंपायर कसा निर्णय घेतात. त्यांच्या रूममध्ये असलेल्या सेटअप आणि डीआरएस मागितल्यानंतर थर्ड अंपायर कशा पद्धतीने निर्णय घेतात हे दाखवणारा व्हिडिओ वेबसाइटवर शेअऱ केला आहे.
World cup 2019 Inside the umpire's room #ICCCricketWorldCup2019 #NZvSL https://t.co/uXqzWkq0Fp
— Suraj Yadav (@IAmYadavSuraj) June 1, 2019
याच सामन्यात करुणारत्नेला जीवदान मिळालं. यात कोणी झेल सोडला नाही की पंचांनी चुकीचा निर्णय दिला नाही. तर न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर करुणारत्नेच्या बॅटला चेंडू लागून स्टंपवर आदळला पण बेल्स पडल्याच नाहीत. यावेळी करुणारत्नेसह मैदानावरील सर्वच खेळाडू आश्चर्यचकीत झाले.
वर्ल्ड़ कपच्या आधी भारतात झालेल्या आयपीएलमध्ये तीनवेळा चेंडू लागुनही बेल्स न पडल्याचा प्रकार घडला होता. आता वर्ल़्ड कपमध्ये दुसऱ्यांदा गोलंदाजांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे. डावाच्या सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर करुणारत्नेच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्टंपला लागला. त्यावेळी करुणारत्ने बाद झालो असं समजून स्तब्धच झाला होता.त्यावेळी करुणारत्ने 10 धावांवर खेळत होता.
VIDEO: कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी धनंजय मुंडेंनी म्हटली 'कविता'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा