नवी दिल्ली,14 ऑक्टोबर : टी20 वर्ल्डकपची(T20World Cup ) सुरुवात 17 ऑक्टोबरला आणि अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. तत्पूर्वी, बीसीसीआयने (BCCI)टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच (Team India New Jersey)केली आहे. या नव्या जर्सीवर कमेंट्सचा वर्षोव होत असतानाच भारतीयांना एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला आहे.
बीसीसीआयने लॉंच केलेली नवी जर्सी जगातील सर्वात उंच इमारतीवर म्हणजेच, बुर्ज खलिफावर झळकली आहे. बुधवारी (१३ ऑक्टोबर) कोट्यवधी भारतीयांची मान उंचावणारी घटना घडली. जगातील सर्वात उंच इमारतीवर भारतीय संघातील खेळाडूंचे भारतीय संघाची नवीन जर्सी परिधान केलेले फोटो झळकले आहे. ८३० मीटर उंचीच्या या इमारतीवर भारतीय खेळाडूंचे फोटो पाहून चाहते देखील भलतेच खुश झाले आहेत.
हे वाचा- T20 World Cup यंदा कोण पटकवणार?, ब्रेट लीने वर्तवली भविष्यवाणी
हा व्हिडीओ एमपीएल स्पोर्ट्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर कॅप्शन देत लिहिले की, “पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाची जर्सी जगातील सर्वात उंच इमारतीवर झळकली.”
The Team India World Cup jersey unveil gets bigger and better with a projection on the iconic Burj Khalifa.
Watch the historic moment here! 🇮🇳 @mpl_sport #BillionCheersJersey #ShowYourGame #TeamIndia pic.twitter.com/Ee8S6rGD6c — BCCI (@BCCI) October 14, 2021
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने नवीन जर्सी लॉन्च करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. हा कार्यक्रम १३ ऑक्टोबर रोजी पार पडला. ही जर्सी पूर्वीच्या जर्सीपेक्षा थोडी वेगळी आहे. या नव्या जर्सीचा रंग आधीच्या जर्सीसारखाच आहे. परंतु त्यावरील डिजाइन वेगळी आहे. या जर्सीवर हलक्या निळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत. तसेच एका बाजूला बीसीसीआयचा लोगो देखील आहे.
View this post on Instagram
ही जर्सी लॉन्च केल्यानंतर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपले मत व्यक्त केले. “भारतीय क्रिकेट संघाचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. त्यांचा उत्साह आणि ऊर्जा दाखवण्याचा यापेक्षा उत्तम मार्ग असूच शकला नसता. भारतीय खेळाडूंची नवीकोरी जर्सी बुर्ज खलिफावर दाखवत चाहत्यांनी एकप्रकारे भारतीय संघाप्रती असलेले त्यांचे निस्सीम प्रेमच दाखवले आहे. यात काही शंका नाही की, यामुळे भारतीय संघाला जेतेपद मिळवण्याच्या मार्गावर आणखी समर्थन मिळेल.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, T20 cricket, T20 world cup, Team india