Home /News /sport /

पुजारावर बोलणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला जाफरने केलं ट्रोल, दिलं सडेतोड प्रत्युत्तर

पुजारावर बोलणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला जाफरने केलं ट्रोल, दिलं सडेतोड प्रत्युत्तर

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) त्याच्या हटके ट्वीट्समुळे कायमच चर्चेत असतो. शुक्रवारी जाफरने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्कस हॅरिस (Marcus Harris) याला ट्रोल केलं. हॅरिसने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) बाबत वक्तव्य केलं होतं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 मे : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) त्याच्या हटके ट्वीट्समुळे कायमच चर्चेत असतो. शुक्रवारी जाफरने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्कस हॅरिस (Marcus Harris) याला ट्रोल केलं. हॅरिसने एका मुलाखतीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या (India vs Australia) ऐतिहासिक ब्रिस्बेन टेस्टबद्दल भाष्यं केलं. ब्रिस्बेन टेस्टमध्ये पुजाराने (Cheteshwar Pujara) एखाद्या ऑस्ट्रेलियन बॅट्समनसारखी हिंमत दाखवली. मार्कस हॅरिसच्या या वक्तव्यावर वसीम जाफरने प्रतिक्रिया दिली. वसीम जाफर त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला, 'ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे बॅटिंग का नाही केली? हेच आश्चर्य आहे.' ऑस्ट्रेलियाचा ओपनर मार्कस हॅरिस युट्यूब चॅनल क्रिकेट लाईफ स्टोरीजसोबत बोलत होता. 'ब्रिस्बेन टेस्टचा शेवटचा दिवस रोमांचक होता. भारत आव्हानाचा पाठलाग करायला जाईल का नाही? याबाबत आम्ही पूर्ण दिवस विचार करत होतो. ऋषभ पंतने त्यादिवशी सर्वोत्तम खेळी केली, पण पुजाराने ज्या पद्धतीने खेळपट्टीवर साहस दाखवलं, ते ऑस्ट्रेलियन बॅट्समनसारखं होतं. त्याने सगळं स्वत:च्या छातीवर झेललं. भारतीय टीमने पुजारासोबत बॅटिंग केली,' असं हॅरिस म्हणाला. मार्कस हॅरिसला या सीरिजमध्ये एकच टेस्ट खेळण्याची संधी मिळाली. यातल्या दोन इनिंगमध्ये त्याने 43 रन केले, तर स्टीव्ह स्मिथलाही (Steve Smith) कमाल करता आली नाही. मार्नस लाबुशेनने (Marnus Labuschagne) 53 पेक्षा जास्तच्या सरासरीने 426 रन केले. ब्रिस्बेन टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये ऋषभ पंतने 138 बॉलमध्ये नाबाद 89 रन केले, तर पुजाराने 211 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली. या टेस्टमध्ये भारताचा 3 विकेटने विजय झाला. याचसोबत भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत सलग दुसऱ्यांदा टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला. याचसोबत 32 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेनमध्ये पराभव झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia, Pujara

    पुढील बातम्या