मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

वसीम जाफरने इंग्लंडच्या जखमेवर मीठ चोळलं, बेक्कार ट्रोल करत म्हणाला...

वसीम जाफरने इंग्लंडच्या जखमेवर मीठ चोळलं, बेक्कार ट्रोल करत म्हणाला...

इंग्लंडची क्रिकेट टीम सध्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या या वादानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) इंग्लंड क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे.

इंग्लंडची क्रिकेट टीम सध्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या या वादानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) इंग्लंड क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे.

इंग्लंडची क्रिकेट टीम सध्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या या वादानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) इंग्लंड क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 जून : इंग्लंडची क्रिकेट टीम सध्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. लॉर्ड्स टेस्टमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिनसनचं (Ollie Robinson) निलंबन करण्यात आलं आहे. 8 वर्षांपूर्वी त्याने केलेल्या वर्णद्वेषी आणि लिंगभेदी ट्वीटमुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतरही रॉबिनसनला पुढची टेस्ट खेळता येणार नाही. रॉबिनसनचं निलंबन झाल्यानंतर अनेक इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी त्यांचं ट्विटर अकाऊंट प्रायव्हेट किंवा डिलीट केलं आहे.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या या वादानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) इंग्लंड क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे. वसीम जाफरने हेरा फेरी चित्रपटाच्या डायलॉगवरून इंग्लंड क्रिकेट बोर्डाला ट्रोल केलं.

वसीम जाफर या त्याच्या भन्नाट मीम्समुळे ओळखला जातो. त्याने इन्स्टाग्रामवर हेरा फेरी चित्रपटाचा एक फोटो पोस्ट केला, यामध्ये परेश रावल आणि सुनिल शेट्टी आहेत. या फोटोमध्ये परेश रावल सुनिल शेट्टीला डिलीट करायला सांगत आहे. 'एवढ्या महत्त्वाच्या सीरिजमध्ये इंग्लंडचे खेळाडू आपले जुने ट्वीट डिलीट करण्यात व्यग्र आहेत,' असं कॅप्शन जाफरने या फोटोला दिलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा ऑफ स्पिनर डॉम बेस याची निवड झाली आहे, यानंतर त्याने स्वत:चं ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे. तर रॉबिनसन याने स्वत:चे सगळे सोशल मीडिया अकाऊंट प्रायव्हेट केले आहेत.

ओली रॉबिनसनच्या वादग्रस्त ट्वीटचं प्रकरण आता पंतप्रधान बोरिस जॉनसन (PM Boris Johnson) यांच्यापर्यंत पोहोचलं आहे. जॉनसन यांनी इंग्लंडच्या क्रीडा मंत्र्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे, तसंच इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री ओलिव्हर डाऊडेन (Oliver Dowden) यांनी सोमवारी रॉबिनसनच्या निलंबनाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे (ECB) केली होती.

पंतप्रधान जॉनसन यांचे प्रवक्ते सोमवारी म्हणाले, 'ओलिव्हर डाऊडेन जसं म्हणाले त्याप्रमाणे हे ट्वीट एका दशकापूर्वीचं आहे. तेव्हा रॉबिनसन लहान होता. तसंच त्याने माफीही मागितली.' त्याआधी डाऊडेन यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं होतं. 'ओलीचे ट्वीट वादग्रस्त आणि चुकीचे होते. एका दशकाआधी लहान मुलाने केलेले ते ट्वीट होते. आता तो मुलगा माणूस झाला आहे आणि त्याने माफीही मागितली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केलं आहे, त्यामुळे याचा पुनर्विचार झाला पाहिजे,' अशी प्रतिक्रिया डाऊडेन यांनी दिली.

First published:

Tags: Cricket, England, Social media