मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20WC: वसीम जाफरने ‘धमाल’ मीम शेअर करत मांडल सेमीफायनलच गणित

T20WC: वसीम जाफरने ‘धमाल’ मीम शेअर करत मांडल सेमीफायनलच गणित

Wasim Jaffer

Wasim Jaffer

टी २० वर्ल्डकपमधील सद्यस्थितीवर टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) एक मजेशीर ट्विट करत सर्वांना धमाल चित्रपटाची आठवण करुन दिली आहे.

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्या रविवारी होणाऱ्या मॅचकडं या दोन देशांपेक्षाही जास्त भारतीय फॅन्सच्या नजरा वळल्या आहेत. या मॅचची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा असून सोशल माीडियावर याचे अनेक मीम्स व्हायरल (Memes Viral) झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) एक मजेशीर ट्विट करत सर्वांना धमाल चित्रपटाची आठवण करुन दिली आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) ग्रुप १ मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ग्रुप २ मध्ये न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीत आहेत. टी-20 वर्ल्ड कप अतिंम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी दोन्ही ग्रुपमधील एक एक संघ पक्के झाले आहेत, तर काही संघ उपांत्य सामन्यात स्थान पक्के करण्यासाठी संघर्ष करत आहेत.

ग्रूप एकमध्ये उपांत्य सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात संघर्ष सुरू होता. मात्र, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवला. मात्र, त्यांना सेमीफायनलमध्ये पोहोचता आले नाही. दुसरीकडे ग्रूप दोनमध्ये भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघ उपांत्य सामना गाठण्याच्या प्रयत्नात आहेत.

अशात वसीम जाफरने ट्वीटमध्ये बॉलिवूड चित्रपट ‘धमाल’मधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिनेता रितेश देशमुखच्या गळ्यात फास लावला गेला आहे आणि तो अभिनेता जावेद जाफरीच्या खांद्यावर उभा आहे. अगदी त्याचप्रकारे अभिनेता आशीष चौधरी अरशद वारसीच्या खांद्यावर उभा आहे. वसीम जाफरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने या अभिनेत्यांना भारत-अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया-इंग्लंड अशी नावे दिली आहेत. वसीमने या फोटोच्या माध्यमातून या संघांची सध्याची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

“सध्याची स्थिती: भारत आणि ऑस्ट्रेलियाला फक्त विजयच नाही तर अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा विजयही महत्त्वाचा आहे.”, असं कॅप्शन लिहित हॅशटॅग टी २० वर्ल्डकप टाकलं आहे. अशी कॅप्शनही जाफरने दिली आहे.

स्कॉटलंडला मात दिल्यानंतर भारत 2 विजयांसह 4 गुण घेऊन तिसऱ्या स्थानावर गेला आहे. नेट-रनरेटच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला मागे टाकलं आहे. तसं पाहायाला गेलं तर भारताचा रनरेट पाकिस्तान आणि न्यूझीलंडपेक्षाही अधिक आहे.

First published:

Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup