दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक आणि 10 रणजी विजेतेपद मिळवणारा 'खास' खेळाडू

दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक आणि 10 रणजी विजेतेपद मिळवणारा 'खास' खेळाडू

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीद्वारे अनेक विक्रम करणाऱ्या वसीम जाफरचा आज वाढदिवस आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी अथवा विक्रम करणाऱ्या खेळाडूना मोठी प्रसिद्धी मिळते. अशी लोकप्रियता प्रथम श्रेणीतील खेळाडूंना फारशी मिळत नाही. पण याला अपवाद आहे तो म्हणजे वसीम जाफर. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीद्वारे अनेक विक्रम करणाऱ्या वसीम जाफरचा आज वाढदिवस आहे. 1978मध्ये मुंबईत जन्मलेला वसीम सध्या विदर्भाकडून रणजी खेळत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सलग दुसरे रणजी विजेतेपद मिळवले. विशेष म्हणजे वसीमचे हे 10वे रणजी जेतेपद आहे.

10 फायनल आणि 10 जेतेपद

1996-97 ते 2012-13 या काळात 8 वेळा रणजी जिंकणाऱ्या मुंबई संघात जाफरचा समावेश होता. त्यानंतर आता सलग दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या विदर्भ संघात देखील जाफर खेळत होता. विदर्भाला ही दोन्ही विजेतेपद मिळवून देण्यात जाफरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सलामीवीर जाफरचे हे 10वे रणजी विजेतेपद आहे. यंदाच्या रणजी स्पर्धेत त्याने 11 सामन्यात 69.13च्या सरासरीने 1 हजार 37 धावा केल्या. यात 4 शतकांचा समावेश आहे.

6 वर्षानंतर पहिले शतक

जाफरने प्रथम श्रेणीमधील दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावले होते. त्याच्या या कामगिरीमुळे 2000मध्ये भारतीय कसोटी संघात त्याची निवड झाली. फेब्रुवारी 2000मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात त्याने दोन्ही डावात मिळून केवळ 10 धावा केल्या. कसोटीमध्ये पहिले शतक करण्यास त्याला 6 वर्ष वाट पहावी लागली. अर्थात त्यानंतर त्याने कसोटीमध्ये द्विशतक देखील केले.

असे आहे जाफरचे शानदार शतक

प्रथम श्रेणी सामन्यात जाफरने 253 सामन्यात 19 हजार 147 धावा केल्या आहेत. नाबाद 314 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. जाफरने प्रथम श्रेणीत 57 तर 88 अर्धशतके केली आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटीत जाफरने 31 सामन्यात 1 हजार 944 धावा केल्या असून त्यात 5 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्याने 2 विकेटसुद्धा घेतल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत केवळ 2 सामने खेळले आहेत त्यात त्याच्या नावावर केवळ 10 धावा आहेत.

VIDEO : सर्जिकल स्ट्राईक -2 पुन्हा शक्य आहे का? ज्यांनी पाकची झोप उडवली त्यांचं उत्तर

First published: February 16, 2019, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading