Home /News /sport /

वसीम जाफर झाला या टीमचा कोच, मायकल वॉनने साधला निशाणा

वसीम जाफर झाला या टीमचा कोच, मायकल वॉनने साधला निशाणा

वसीम जाफर (Wasim Jaffer) आणि मायकल वॉन (Michael Vaughan) हे दोन्ही क्रिकेटपटू सोशल मीडियावरून एकमेकांवर निशाणा साधत असतात. वसीम जाफर याची ओडिसा क्रिकेट (Odisha Cricket) टीमच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतरही मायकल वॉन याने त्याला टोमणा मारला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 जुलै : वसीम जाफर (Wasim Jaffer) आणि मायकल वॉन (Michael Vaughan) हे दोन्ही क्रिकेटपटू सोशल मीडियावरून एकमेकांवर निशाणा साधत असतात. वसीम जाफर याची ओडिसा क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतरही मायकल वॉन याने त्याला टोमणा मारला. वसीम जाफर प्रशिक्षक झाल्याचं कळताच वॉनने त्याला असिस्टंटची गरज असल्याचं ट्वीट केलं. मायकल वॉनच्या या ट्वीटनंतर भारतीय चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. आम्ही भारतीय आहोत, आधी एका वर्षाच्या इंटर्नशीपसाठी अर्ज कर, असं एकाने लिहिलं. तर दुसऱ्याने जाफरने ट्रोल केलं तरी तुझं पोट भरलं नाही का? असा सवाल विचारला. वॉटर बॉय पदासाठी अर्ज कर, असा टोमणाही वॉनला मारण्यात आला. जाफरने इंग्लंडमध्ये तीन टेस्टमध्ये दोन अर्धशतकं केली आहेत, यातल्या एका सामन्यात भारताचा विजय झाला. दुसरीकडे वॉनने भारतात टेस्टमध्ये फक्त डोकंच खाजवलं, त्यामुळे त्याला या पदामध्ये रस असेल, असंही एक युजर म्हणाला. michael vaughan, cricket news वसीम जाफरला दोन वर्षांसाठी ओडिसा (Odisha Cricket) टीमचं प्रशिक्षक करण्यात आलं आहे. ओसीएच्या क्रिकेट सल्लागार समितीने जाफरची निवड केली. तो आता ओडिसाचा माजी कर्णधार रश्मी रंजन परीदा यांच्याऐवजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल. युवा खेळाडूंना शोधण्याच्या कामासह जाफर कोचिंग डेव्हलपमेंट प्रोग्रामही पाहणार आहे, असं ओडिसा क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनी सांगितलं. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनसोबत वाद झाल्यानंतर वसीम जाफरने राजीनामा दिला होता. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक रन करणारा जाफर दुसऱ्यांदा एखाद्या राज्याच्या टीमचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे. मार्च 2020 साली जाफरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, यानंतर तो उत्तराखंड टीमचा प्रशिक्षक झाला. एका वर्षाचा करार असताना वाद झाले म्हणून त्याने 8 महिन्यांमध्येच पद सोडलं. जाफरने भारताकडून 31 टेस्ट आणि 2 वनडे खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 1,944 आणि 10 रन केले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 5 शतकं केली. 260 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर तब्बल 19,410 रन आहेत. आपल्या करियरमध्ये त्याने 57 शतकं आणि 91 अर्धशतकं केली. 18 लिस्ट ए सामन्यांमध्ये जाफरने 4,849 रन केले. जाफर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. ओडिसा 2019-20 च्या रणजी ट्रॉपीमध्ये क्वार्टर फायनलला पोहोचली होती. तेव्हा बंगालने ओडिसाचा पराभव केला होता. बॅटिंग ओडिसाच्या टीमची कमजोरी आहे. राज्य सरकारने परवानगी दिली, तर टीमचा कॅम्प 25 जुलैपासून सुरू होऊ शकतो.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या