मुंबई, 28 मे : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन (Michael Vaughan) आणि भारताचा माजी ओपनर वसीम जाफर (Wasim Jaffer) पुन्हा एकदा सोशल मीडियावर एकमेकांना भिडले आहेत. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये मायकल वॉन म्हणाला, की माजी वसीम जाफरला ब्लॉक करण्याची इच्छा आहे. यावर जाफरने एक फोटो पोस्ट करत मायकल वॉनला प्रत्युत्तर दिलं. यानंतर मायकल वॉननेही जाफरच्या प्रत्युत्तरावर आणखी एक प्रतिक्रिया दिली. जो क्रिकेटपटू माझ्या ऑफ स्पिनवर आऊट झाला आहे, त्याला मी कधीच ब्लॉक करणार नाही, असं मायकल वॉन म्हणाला.
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारा वसीम जाफर खूपवेळा मजेदार मीम्स आणि पोस्ट शेयर करत असतो. अनेकवेळा तो परदेशी खेळाडूंनाही ट्रोल करतो. याबाबतच मायकल वॉन क्रिकट्रॅकरला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलला. सोशल मीडियावर कोणत्या खेळाडूला ब्लॉक करायचं आहे, असा प्रश्न मायकल वॉनला विचारण्यात आला, तेव्हा त्याने वसीम जाफरचं नाव घेतलं.
'मी वसीम जाफरला ब्लॉक करेन, खरं तर मी कोणालाच ब्लॉक करणार नाही, मी फक्त अशा लोकांसोबतच हे करेन, जे मला शिव्या देतात,' अशी प्रतिक्रिया मायकल वॉनने दिली. जाफरनेही यावर मजेशीर उत्तर दिलं. त्याने हे ट्वीट रिट्विट करत भारतीय क्रिकेटपटूंचा जल्लोष करतानाचा फोटो शेयर केला. यानंतर मायकल वॉननेही जाफरला प्रत्युत्तर दिलं. मी कधीच असं करणार नाही वसीम... माझ्या खराब ऑफ स्पिनवर आऊट होणाऱ्या खेळाडूला मी कधीच ब्लॉक करणार नाही, असं मायकल वॉन म्हणाला.
I would never do that Wasim ... No player that got out to my filthy off spin will ever be blocked ... #😜 https://t.co/CfkKk670pt
— Michael Vaughan (@MichaelVaughan) May 27, 2021
वॉनने 2002 साली लॉर्ड्स टेस्टमध्ये जाफरला 53 रनवर आऊट केलं होतं. याआधीही याचवरून वॉनने जाफरला चिडवलं होतं. मायकल वॉनने त्याच्या करियरमध्ये इंग्लंडकडून 82 टेस्ट, 86 वनडे आणि 2 टी-20 खेळल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket