मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

...म्हणून पाकिस्तानचा कोच झालो नाही, वसीम अक्रमने दिलं रवी शास्त्रींचं उदाहरण

...म्हणून पाकिस्तानचा कोच झालो नाही, वसीम अक्रमने दिलं रवी शास्त्रींचं उदाहरण

पाकिस्तानचा महान क्रिकेटपटू वसीम अक्रम (Wasim Akram) याने टीमचं प्रशिक्षक व्हावं, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. पण प्रत्येक वेळा वसीम अक्रमने याला नकार दिला. हे सांगताना अक्रमने भारताचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचं उदाहरण दिलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 6 ऑक्टोबर : पाकिस्तानचा महान क्रिकेटपटू वसीम अक्रम (Wasim Akram) याने टीमचं प्रशिक्षक व्हावं, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. पण प्रत्येक वेळा वसीम अक्रमने याला नकार दिला. राष्ट्रीय टीमचा कोच होण्यात आपल्याला रस का नाही, याचं उत्तर वसीम अक्रमने एका मुलाखतीमध्ये दिलं आहे. हे सांगताना अक्रमने भारताचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचं उदाहरण दिलं आहे. क्रिकेट पाकिस्तान डॉट कॉम डॉट पीकेला दिलेल्या मुलाखतीमध्ये वसीम अक्रम बोलत होता.

'मला एखाद्याने केलेलं गैरवर्तन सहन होत नाही. टीमची कामगिरी खराब झाली तर सोशल मीडियावर कोच आणि वरिष्ठांवर टीका केली जाते, हे न समजण्याइतका मी मूर्ख नाही. या सगळ्यासाठी ज्या प्रकारचा संयम लागतो, तसा माझ्यामध्ये नाही,' असं वक्तव्य वसीम अक्रमने केलं आहे.

'क्रिकेटबद्दलचं चाहत्यांचं प्रेम मी समजू शकतो, पण सोशल मीडियावर वाईट भाषा का वापरली जाते ते मला कळत नाही. सोशल मीडियावर आपण काय बोलतो, त्यावरून आपली मानसिकता कळते. कोच आणि सपोर्ट स्टाफ फक्त रणनिती ठरवू शकतात आणि खेळाडूंना प्रोत्साहन देऊ शकतात, पण खेळाडूंना मैदानात जाऊन खेळावं लागतं,' असं अक्रम म्हणाला.

'कधीतरी तुमची कामगिरी चांगली होते, तर कधी खराब होते. दुसऱ्या देशांमध्ये अशाप्रकारचं वर्तन केलं जातं का? रवी शास्त्रींना सोशल मीडियावर कशापद्धतीने वागणूक मिळते ते बघितलं का? लोकं अशापद्धतीने वागतात ते पाहून मला भीती वाटते,' अशी प्रतिक्रिया वसीम अक्रमने दिली.

'मी कोच नसलो तरी खेळाडूंच्या संपर्कात असतो. त्यांच्यासमोर काही अडचण असेल, तेव्हा ते माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी येतात. पाकिस्तान क्रिकेटला मदत करण्यासाठी मी नेहमी तयार असतो,' असं अक्रम म्हणाला.

First published:

Tags: Pakistan Cricket Board, Ravi shastri