जेव्हा वसीम अकरमने सचिनला विचारले, ‘आईला विचारून खेळायला आलास का?’

सचिननेही एका मुलाखतीत १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या पहिल्या कसोटी मालिकेनंतर क्रिकेट सोडण्याचा विचार केल्याचे सांगितले

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2018 12:17 PM IST

जेव्हा वसीम अकरमने सचिनला विचारले, ‘आईला विचारून खेळायला आलास का?’

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अकरमने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक मजेशीर किस्सा सांगितला. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वसीम म्हणाला की, जेव्हा सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याचा पहिलाच दौरा पाकिस्तानविरुद्ध होता. त्याला पाहिल्यावर आम्ही सगळेच म्हणालो की, हा एवढा लहान मुलगा कसा काय क्रिकेट खेळायला आला.

सचिनने १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्यांदा सचिन पाकिस्तानचा दौरा करत होता. सचिनसमोर आव्हान होतं ते म्हणजे वेगवान गोलंदाजांचं. १९८४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला वसीम अकरम म्हणाला की, ‘दौरा सुरू होण्यापूर्वी आम्हाला कळलेलं की १६ वर्षांचा मुलगा या दौऱ्यात आपल्या विरुद्ध खेळणार आहे. पण जेव्हा आम्ही त्याला पाहिले तेव्हा तो १४ वर्षांचा असल्यासारखा वाटत होता. तेव्हा मी त्याला विचारले की, घरी आईला विचारून आला आहेस का?’

मात्र आता वसीमला सचिनचा अभिमानच वाटतो. सचिनसमोर गोलंदाजी करणं सोप्पी गोष्ट नाही हे वसिमने मान्य केलं. सचिननेही एका मुलाखतीत १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या पहिल्या कसोटी मालिकेनंतर क्रिकेट सोडण्याचा विचार केल्याचे सांगितले होते. सचिन म्हणाला की, ‘कराचीमधील माझ्या आयुष्यातील पहिला कसोटी सामना शेवटचा ठरेल. माझ्यासोबत काय होतंय हे मला कळत नव्हतं. एकीकडून वकार युनिस गोलंदाजी करत होता तर दुसरीकडून वसीम अकरम. हे दोघं रिवर्स स्विंगही करत होते. अशा जबरदस्त गोलंदाजीसाठी माझ्याकडे कोणताच प्लॅन नव्हता.’

VIDEO: 'अल्याड शंकर धुणे धुतो, पल्याड गौराई न्याल ग'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 12:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...