'पाकिस्तानला ठोसा गरजेचा', वसीम आक्रमने मागितली खेळाडूची माफी!

'पाकिस्तानला ठोसा गरजेचा', वसीम आक्रमने मागितली खेळाडूची माफी!

वसीम आक्रमने चॅम्पियन खेळाडूची माफी मागत एक देश म्हणून जागं होण्यासाठी ठोसा गरजेचा आहे असं म्हटलं.

  • Share this:

लाहोर, 17 सप्टेंबर : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम आक्रमने प्रोफेशनल बॉक्सर मोहम्मद वसीमची देशाच्यावतीनं माफी मागितली आहे. मोहम्मद वसीम शुक्रवारी 52.5 किलो वजनी गटात फिलीपाइन्सच्या कॉनरेडो तानामोरला पराभूत करून देशात परतला होता. त्यानं फक्त 62 सेकंदात ही लढत जिंकली होती. पण जेव्हा तो मायदेशी आला तेव्हा स्वागतासाठी कोणीच हजर नव्हत याबद्दलची नाराजी सोशल मीडियावर जाहीर केली होती.

मोहम्मद वसीमने म्हटलं होतं की, मी विमानतळावर स्वागतासाठी लढत नाही. मी पाकिस्तानचं संपूर्ण देशात स्वागत व्हावं म्हणून लढत आहे. प्रत्येक शिबिर, ट्रेनिंग, दौऱ्यात बॉक्सिंगच्या जगात पाकिस्तानची प्रतिभा दाखवायची आहे.

बॉक्सरच्या ट्विटनंतर दिग्गज क्रिकेटपटू वसीम आक्रमने त्याची माफी मागितली. आक्रमने म्हटलं की, मी पाकिस्तानच्यावतीने माफी मागतो. कधी कधी आम्हाला एक देश म्हणून जागं होण्यासाठी एखादा ठोसा गरजेचा असतो. तो आठवण करून देतो की आपल्या हिरोंसोबत कसं वागलं पाहिजे. पुढच्यावेळी विमानतळावर मी स्वत: तुला न्यायला येईन. आताच्या विजयाबद्दल अभिनंदन.

गेल्या वर्षीच्या आयबीएफ फ्लाइवेट टायटलच्या अंतिम लढतीत मोहम्मद वसीम खेळला होता. त्याने प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये 10 सामने खेळले आहेत त्यापैकी 9 मध्ये विजय मिळवला आहे. यातील 7 लढती नॉकआऊट होत्या.

वसीमने 2014 मध्ये आशियाई खेळात कांस्यपदक जिंकलं होतं. त्याने 2014 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य आणि 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकलं होतं.

भारतीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग? BCCI नाही तर 'हा' टॉप कॉप लावणार छडा!

CCTV VIDEO: ठाण्यात लिफ्टवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 08:21 AM IST

ताज्या बातम्या