भारताला 'वाडा'चा दणका, टोकियो ऑलिम्पिकआधी NDTL वर निलंबनाची कारवाई

भारताला 'वाडा'चा दणका, टोकियो ऑलिम्पिकआधी NDTL वर निलंबनाची कारवाई

टोक्यो ऑलिम्पिकला काही महिन्यांचा काळ राहिला असतानाच भारताच्या नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरीवर वाडाने बंदीची कारवाई केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी (वाडा) ने भारताला मोठा दणका दिला आहे. भारताच्या नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी (एनडीटीएल) ला सहा महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. वाडाने म्हटलं आहे की, एनडीटीएल लॅबकडून आंतरराष्ट्रीय नियमांची अंमलबजावणी न केल्यानं हे पाऊल उचललं आहे. टोक्यो ऑलिम्पिकला एक वर्षापेक्षाही कमी काळ उरला असताना वाडाच्या या निर्णयानं भारताच्या उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधाच्या मोहिमेला धक्का बसणार आहे.

वाडाने नवी दिल्लीतील एनडीटीएलवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. याअतंर्गत एनडीटीएल कोणत्याही प्रकारची उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी करू शकत नाही. त्यांना रक्त, लघवी तपासणीसुद्धा करता येणार नाही. आतापर्यंत ज्या नमुन्यांची चाचणी बाकी आहे ते नमुने वाडाकडून मान्यता असलेल्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येतील.

दरम्यान, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (नाडा) खेळाडूंचे रक्ताचे आणि लघवीचे नमुने घेऊ शकते मात्र त्यांना भारताबाहेर वाडाच्या मान्यताप्राप्त लॅबमध्ये चाचणी करावी लागेल. वाडाने स्पष्ट केल्यानुसार, त्यांच्या एका पथकानं एनडीटीएलला भेट दिली होती. त्यावेळी लॅबने आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकष पूर्ण केले नसल्याचं आढळून आलं. वाडानं याची माहिती संकेतस्थळावर दिली आहे.

एनडीटीएल या निलंबनाविरुद्ध लुसानेत असलेल्या कोर्ट ऑफ आर्बिटेशन फॉर स्पोर्ट्स मध्ये 21 दिवसांत अपील करू शकते. जर भारतानं आपली बाजू भक्कमपणे मांडली तर हे निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.

VIDEO : राज ठाकरेंचा पुन्हा आक्रमक बाणा, कार्यकर्त्यांशी बोलताना सरकारला आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2019 10:41 AM IST

ताज्या बातम्या