Home /News /sport /

द्रविड नाही तर या भारतीय खेळाडूला व्हायचं होतं टीम इंडियाचा कोच, पण..., गांगुलीचा मोठा खुलासा

द्रविड नाही तर या भारतीय खेळाडूला व्हायचं होतं टीम इंडियाचा कोच, पण..., गांगुलीचा मोठा खुलासा

टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा (Team India) मुख्य प्रशिक्षक झाला. पुढच्या दोन वर्षांसाठी द्रविडला ही जबाबदारी देण्यात आली आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर : टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा (Team India) मुख्य प्रशिक्षक झाला. पुढच्या दोन वर्षांसाठी द्रविडला ही जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल द्रविड हा रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) उत्तराधिकारी होईल, असं आधीपासूनच सांगितलं जात होतं. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मात्र व्हीहीएस लक्ष्मण (VVS Laxman) याला टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षक व्हायचं होतं, पण काही कारणांमुळे या गोष्टी शक्य झाल्या नाहीत, असं सांगितलं आहे. सौरव गांगुली क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्यासोबत बोलत होता. लक्ष्मणला टीम इंडियाचं मुख्य कोच व्हायचं होतं, पण काही कारणांमुळे त्याला ही जबाबदारी मिळाली नाही. भविष्यात मात्र त्याला ही जबाबदारी मिळू शकते, असं गांगुली म्हणाला. लक्ष्मण काहीच दिवसांपूर्वी द्रविडच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएचा प्रमुख झाला आहे. द्रविडही अंडर-19 आणि इंडिया-ए चा कोच होण्याआधी एनसीएचा प्रमुख होता. आता ही जबाबदारी लक्ष्मणच्या खांद्यावर आली आहे. पुढची तीन वर्ष लक्ष्मण एनसीएचा प्रमुख असेल. 'द्रविडला मुख्य प्रशिक्षक व्हायला तयार करणं खूप कठीण होतं, कारण टीम इंडिया वर्षातले 9 महिने प्रवास करते. या कारणामुळे द्रविड ही जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता. राहुल आमच्या मनात बऱ्याच काळापासून होता. मी आणि जय शाह याचं एकच मत होतं, पण घरापासून एवढा काळ लांब राहण्यासाठी तो तयार नव्हता. आयपीएल 2021 दरम्यान आम्ही पुन्हा त्याच्यासोबत बोललो, तेव्हा तो तयार झाला,' अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासून पदभार स्वीकारला. यानंतर टी-20 सीरिजमध्ये भारताचा 3-0 ने आणि टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने विजय मिळवला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rahul dravid, Sourav ganguly, Team india

    पुढील बातम्या