Home /News /sport /

Andrew Symonds ला श्रद्धांजली देताना VVS Laxman ने केली मोठी चूक, नंतर मागितली माफी

Andrew Symonds ला श्रद्धांजली देताना VVS Laxman ने केली मोठी चूक, नंतर मागितली माफी

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ऑलराऊंडर एण्ड्रयू सायमंड्सचं (Andrew Symonds Death) शनिवारी रस्ते अपघातामध्ये निधन झालं. भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यानेही सायमंड्सला ट्विटरवरून श्रद्धांजली दिली, पण लक्ष्मणने यात चूक केली, यानंतर त्याला माफीही मागावी लागली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 मे : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ऑलराऊंडर एण्ड्रयू सायमंड्सचं (Andrew Symonds Death) शनिवारी रस्ते अपघातामध्ये निधन झालं. सायमंड्सच्या मृत्यूनंतर जगभरातल्या क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यानेही सायमंड्सला ट्विटरवरून श्रद्धांजली दिली, पण लक्ष्मणने यात चूक केली, यानंतर त्याला माफीही मागावी लागली. 46व्या वर्षी सायमंड्सने अखेरचा श्वास घेतला. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 26 टेस्ट, 198 वनडे आणि 14 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. सायमंड्सच्या आठवणीत अनेक क्रिकेटपटूंनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली, पण लक्ष्मणने इमोजी टाकण्याच्या नादात मोठी चूक केली. 'भारतामध्ये सकाळीच सकाळी वाईट बातमी मिळाली. माझा प्रिय मित्र, देव तुझ्या आत्म्याला शांती देओ. एवढी वाईट बातमी.' याचसमोबत त्याने दोन इमोजी ट्वीट केल्या, यातली पहिली इमोजी तुटलेल्या हृदयाची होती, तर दुसरी रडण्याची. यातली दुसरी इमोजी रडण्याची असली तरी ती आनंदाश्रूंची होती, यावरून चाहत्यांनी लक्ष्मणला इमोजी बदलण्याचा सल्ला दिला. लक्ष्मणला याबाबत कळालं तेव्हा त्याने ट्विटरवर रिप्लाय करून माफी मागितली. चुकीची इमोजी पोस्ट करण्याबद्दल माफ करा, असं ट्वीट लक्ष्मणने केलं. सायमंड्सने 26 टेस्टमध्ये 2 शतकं आणि 10 अर्धशतकांच्या मदतीने 1,462 रन केले, तर 198 वनडेमध्ये त्याच्या नावावर 9 शतक आणि 30 अर्धशतकांसह 5,088 रन आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या