मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

गांगुली, द्रविडनंतर आता लक्ष्मणचीही नवी इनिंग, दादाने दिली मोठी जबाबदारी!

गांगुली, द्रविडनंतर आता लक्ष्मणचीही नवी इनिंग, दादाने दिली मोठी जबाबदारी!

सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यानंतर आता व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यानेही भारतीय क्रिकेटमध्ये नवी इनिंग सुरू केली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 डिसेंबर : सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यानंतर आता व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यानेही भारतीय क्रिकेटमध्ये नवी इनिंग सुरू केली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण आता बंगळुरूमधल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएचा (NCA) प्रमुख झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविडने टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकाची सूत्र स्वीकारली, यानंतर एनसीएचं पद खाली झालं होतं, याच जागेवर लक्ष्मणची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरव गांगुली हा सध्या बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष, द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आणि लक्ष्मण एनसीएचा प्रमुख आहे.

एनसीएची सूत्र स्वीकारल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण याने काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. एनसीए कार्यालयातला पहिलाच दिवस, नव्या आव्हानांसाठी सज्ज आहे. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासोबत काम करण्यासाठी उत्सूक आहे, असं कॅप्शन लक्ष्मणने या फोटोंना दिलं आहे.

एनसीएमध्ये भारतातल्या युवा आणि प्रतिभावान खेळाडूंना तयार केलं जातं. गेली कित्येक वर्ष राहुल द्रविडने ही जबाबदारी उत्कृष्ट पार पाडली. राहुल द्रविडच्या या कामगिरीमुळेच भारताला मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे तरुण खेळाडू मिळाले. राहुल द्रविडचं हे काम आता पुढे घेऊन जायची जबाबदारी लक्ष्मणवर आहे. मूळचा हैदराबादचा असलेला लक्ष्मण बंगळुरूमध्ये येऊन एनसीएची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हता, पण सौरव गांगुलीने त्याला यासाठी तयार केल्याचं बोललं जातंय.

व्हीव्हीएस लक्ष्मण निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये हैदराबादच्या टीमचा मेंटर होता, तसंच त्याने सहा वर्ष बंगाल टीमचा बॅटिंग सल्लागार म्हणूनही काम केलं. आता एनसीएचा प्रमुख झाल्यानंतर लक्ष्मणचं त्याचे सहकारी आणि भारतीय खेळाडू इरफान पठाण आणि आर.अश्विन यांनी अभिनंदन केलं आहे.

'लक्ष्मणचं अभिनंदन, सध्या एनसीएचं प्रमुख होण्यासाठी त्याच्यापेक्षा चांगलं नाव नव्हतं,' असं इरफान पठाण म्हणाला. तर अश्विनने शाळेत नवा शिक्षक आल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

First published: