‘मला शिव्या देऊन दिल्लीचं प्रदूषण कमी होणार असेल तर...’ लक्ष्मणच्या ‘त्या’ फोटोवरून ट्विटरवर राडा

‘मला शिव्या देऊन दिल्लीचं प्रदूषण कमी होणार असेल तर...’ लक्ष्मणच्या ‘त्या’ फोटोवरून ट्विटरवर राडा

नवी दिल्लीतील प्रदूषणावर नेटकऱ्यांनी दिग्गज क्रिकेटपटूची घेतली शाळा.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : नवी दिल्लीमध्ये गेला महिना भर वायू प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी आप सरकराच्या वतीनं सम-विषम ही योजना राबवण्यात आली. मात्र त्याचा विशेष काही परिणाम झाल्याचे दिसत नाही आहे. यासंदर्भात आज दिल्लीतील प्रदुषणाबाबत दिल्ली सरकार, सर्व राज्यांचे खासदार आणि एमसीडी (Municipal Corporation of Delhi) यांच्यावतीनं एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

मात्र, या बैठकीला नवी दिल्लीचा खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर अनुपस्थित राहिला. कारण गंभीर सध्या इंदूरमध्ये भारत-बांगलादेश यांच्यातील सामन्यासाठी समालोचन करत आहेत. दरम्यान गौतम गंभीरला सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले जात आहे. याचे कारण आहे व्हीव्हीएस लक्ष्मण यांनं पोस्ट केलेला एक फोटो.

लक्ष्मणनं केलेल्या ट्वीटमुळे गंभीर ट्रोल होत आहे. लक्ष्मणनं इंदूरमधल्या खास पोहे-जिलेबी यांचा आनंद घेतला. याचा फोटो ट्वीट करत, कधी पोह्यासारखा तिखट कर कधी जिलेबीसारखा गोड, आज आम्ही असा नाश्ता केला असे कॅप्शन लिहत गौतम गंभीरसह फोटो टाकला.

दरम्यान हा फोटो टाकल्यानंतर ज्यांना पोहा-जलेबी खायला वेळ आहे पण प्रदूषणावर काम करण्यासाठी वेळ नाही, असे म्हणत ट्रोल करण्यात आले.

त्यानंतर गौतम गंभीरनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देत, मला शिव्या देऊन दिल्लीतील प्रदूषण कमी होत असे तर खुशाल करा असे ट्वीट केले.

लक्ष्मणच्या त्या फोटोवर ट्रोल केल्यानंतर गंभीरनं दिल्लीतील समस्यांकडे लक्ष द्या, असा सल्लाही नेटकऱ्यांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 06:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading