Home /News /sport /

‘Pro Kabaddi चा प्रोमो रिलीज; हटके अवतारात दिसला MS Dhoni

‘Pro Kabaddi चा प्रोमो रिलीज; हटके अवतारात दिसला MS Dhoni

PKL Season 8

PKL Season 8

प्रो कबड्डीचा प्रोमो रिलीज (PKL Season 8)झाला आहे. सध्या हा प्रोमो जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली, 6 डिसेंबर: प्रो कबड्डी लीग सीझन 8 ची (PKL Season 8 ) तारीख जाहीर झाली आहे. 22 डिसेंबरपासून या लीगला सुरुवात होणार असून, पहिला सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. दरम्यान, प्रो कबड्डीचा प्रोमो रिलीज झाला आहे. सध्या हा प्रोमो जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी(MS Dhoni) हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहे. प्रो कबड्डीचा प्रोमोची थीम ‘तू ले पंगा है’ आहे, तर त्याचे घोषवाक्य ‘भिडेगा तो बढेगा’ आहे. या एका मिनिटाच्या प्रोमोमध्ये धोनी दिसला आहे. संपूर्ण प्रोमोमध्ये धोनीला लोकांसाठी प्रेरणेचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. या लीगमध्ये 12 संघ सहभागी होतील ज्यामध्ये अनेक रोमांचक सामने अपेक्षित आहेत. मात्र, सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मैदानात परवानगी दिली जाणार नाही. दोन वर्षांनंतर ही लीग आयोजित करण्यात आली आहे. 2020 मध्ये कोरोनामुळे प्रो कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे देशभरातील कबड्डी चाहते आपल्या आवडत्या संघांच्या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. म्हणूनच पहिले चार दिवस तीन सामन्यांच्या दराने आयोजित केले जात आहेत, असे मार्शल स्पोर्ट्सने म्हटले आहे. कोरोनामुळे संपूर्ण सीझन शेरेटन ग्रँड बेंगळुरू येथील व्हाईटफिल्ड हॉटेल आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. हॉटेल बायोबबल अंतर्गत आणले जात असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    पुढील बातम्या