• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • इंग्लंडमध्ये मॅच सुरू असतानाच महिला प्रेक्षकासोबत त्याने केलं धक्कादायक कृत्य, व्हायरल झाला VIDEO

इंग्लंडमध्ये मॅच सुरू असतानाच महिला प्रेक्षकासोबत त्याने केलं धक्कादायक कृत्य, व्हायरल झाला VIDEO

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या व्हायटॅलिटी ब्लास्टच्या (Vitality Blast) एका सामन्यात झालेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 जून : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या व्हायटॅलिटी ब्लास्टच्या (Vitality Blast) एका सामन्यात झालेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका विकृताने महिलेसोबत आक्षेपार्ह प्रकार केला आहे, यानंतर या माणसावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लंडनमध्ये सरे आणि मिडलसेक्स (Surrey vs Middlesex) यांच्याविरुद्ध सामना सुरू होता, या सामन्यादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना कॅमेरामध्येही कैद झाली आहे. या सामन्यात सरेने टॉस जिंकून पहिले फिल्डिंचा निर्णय घेतला, यानंतर स्टीव्ह इस्कान्झी आणि डेरली मिचेलच्या अर्धशतकामुळे मिडलसेक्सने 7 विकेट गमावून 174 रन केले. मिडलसेक्सने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग सरेने एक ओव्हर आधीच 5 विकेट गमावून पूर्ण केला. स्टीव्हने 51 बॉलमध्ये 7 फोर आमि एका सिक्सच्या मदतीने 64 रन केले आणि डेरलीने 36 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्स मारत 58 रनची खेळी केली. सरेचा बॉलर गज एटकिन्सनने 36 रन देऊन 4 विकेट मिळवल्या. सरेकडून ओली पोपने 35 बॉलमध्ये नाबाद 52 रन केले, यात 3 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. जेमी ओव्हरटनने 10 बॉलमध्ये 3 सिक्स मारत नाबाद 24 रन केले. दोन्ही टीममध्ये ही शानदार मॅच खेळली गेली असली, तरी चुकीच्या कारणांमुळेच या मॅचची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
  Published by:Shreyas
  First published: