मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /वडिलांच्या निधनानंतर विश्वनाथन आनंद गहिवरला, इमोशनल मेसेजमधून मांडल्या भावना

वडिलांच्या निधनानंतर विश्वनाथन आनंद गहिवरला, इमोशनल मेसेजमधून मांडल्या भावना

वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंद (Viswanathan Anand) याने  वडिलांबद्दल अत्यंत इमोशनल मेसेज लिहून भावना मांडल्या आहेत. आनंद यांचे वडील के. विश्वनाथन (K. Viswanathan) यांचं गुरुवारी निधन झालं. ते

वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंद (Viswanathan Anand) याने वडिलांबद्दल अत्यंत इमोशनल मेसेज लिहून भावना मांडल्या आहेत. आनंद यांचे वडील के. विश्वनाथन (K. Viswanathan) यांचं गुरुवारी निधन झालं. ते

वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंद (Viswanathan Anand) याने वडिलांबद्दल अत्यंत इमोशनल मेसेज लिहून भावना मांडल्या आहेत. आनंद यांचे वडील के. विश्वनाथन (K. Viswanathan) यांचं गुरुवारी निधन झालं. ते

चेन्नई, 18 एप्रिल: वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथ आनंद (Viswanathan Anand) याने  वडिलांबद्दल अत्यंत इमोशनल मेसेज लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. आनंद यांचे वडील के. विश्वनाथन (K. Viswanathan) यांचं गुरुवारी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या आनंदनं वडिलांच्या निधानंतर पहिल्यांदाच ट्विट करत त्याच्या भावना जगासमोर मांडल्या आहे. 'मी वडिलांचं देणं लागतो,' असं आनंद यावेळी म्हणाला आहे.

"माझे वडील के. विश्वनाथन यांचं 15 एप्रिल रोजी निधन झालं. मी चेन्नईमध्ये असल्यानं मला त्यांना अनेकदा भेटता आलं. मी त्यांचं देणं लागतो. माझ्या करियरमध्ये आईचं योगदान मोठं आहे. पण वडिलांनी देखील नेहमी माझा उत्साह वाढवला आणि मला भक्कम पाठिंबा दिला."

"माझी वर्ल्ड सब-ज्युनिअर स्पर्धा, 3 राष्ट्रीय विजेतेपदं आणि नंतर वर्ल्ड चॅम्पियनशीप या प्रत्येक वेळी ते माझ्या सोबत आले होते, हे मला चांगलं आठवतं. त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं. त्यांचा सल्ला आणि उदाहरण या दोन्ही गोष्टी माझ्या चांगल्या आणि वाईट काळात सोबत होत्या," असं आनंदनं सांगितलं.

" तुम्ही पाठवलेल्या संदेशाबद्दल आभार.  रेल्वे हे त्यांचं पॅशन होतं. त्यांचे रेल्वेतील अनेक सहकारी त्याबद्दल त्यांना आठवणीनं लिहित, हे पाहून मला नेहमी आनंद होत असे. तुम्ही आमच्यासाठी अनेक चांगल्या आठवणी मागे सोडून गेला आहात.  ICF पासून ते दक्षिण रेल्वेच्या जनरल मॅनेजरपर्यंत त्यांनी केलेल्या प्रवासाबद्दल मला त्यांचा अत्यंत अभिमान आहे. आमच्या घरातील ते पहिले जनरल मॅनेजर होते, असं त्यांनी मला एकदा सांगितलं होतं. अप्पा सर्व गोष्टींसाठी खूप खूप आभार, मला तुमची सदैव आठवण येत राहील..." या शब्दात विश्वनाथन आनंदनं त्याच्या वडिलांबद्दलच्या भावना मांडल्या आहेत.

आनंदच्या पत्नी अरुणा यांनी देखील के. विश्वनाथन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "आनंदला त्यांनी भक्कम साथ दिली. त्याच्यावर चांगले संस्कार केले. आनंदच्या यशाचा त्यांना नेहमी अभिमान होता," असं अरुणा यांनी म्हंटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Emotional, Railway, Social media, Tweet, Twitter