सैनिकांबद्दल बोलताना सेहवाग भावूक, VIDEO द्वारे व्यक्त केल्या भावना

सैनिकांबद्दल बोलताना सेहवाग भावूक, VIDEO द्वारे व्यक्त केल्या भावना

सेहवागने सैनिकांना मदत करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 डिसेंबर : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि स्टार फलंदाज वीरेंद्र सेहवागने सैनिकांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. शहीद सप्ताह सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सेहवागने सैनिकांना मदत करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

'आपल्या देशाकडे येणारी प्रत्येक गोळी जवान स्वत:च्या छातीवर झेलत असतात. पण असे सैनिक जखमी झाल्यानंतर त्यांना आपल्या मदतीची आवश्यकता असते. तसंच एखादा सैनिक शहीद झाल्यानंतर त्यांची पत्नी विधवा होते. अशावेळी आपण त्यांची मदत करायला हवी. तुम्हाला शक्य असणारी रक्कम देऊन तुम्ही सैनिकांची मदत करा,' असं आवाहन या व्हिडिओद्वारे सेहवागने केलं आहे.

याआधीही अनेकदा सेहवागने सैनिकांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता सुरू असलेल्या शहीद सप्ताहच्या निमित्ताने सेहवागने पुन्हा एकदा सैनिकांना मदत करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ केला आहे.

दरम्यान, क्रिकेटमधून घेतल्यानंतर सेहवाग सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झाला असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याने कधी विनोदी पोस्ट्स तर कधी भावनिक पोस्ट टाकून सोशल मीडियाचंही मैदान गाजवलं आहे.

VIDEO : शाहरूखच्या बिनधास्त प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची बेधडक उत्तरं!

First published: December 2, 2018, 5:43 PM IST

ताज्या बातम्या