World Cup : सेहवागने निवडला भारतीय संघ, कर्णधार कोण?

2015 च्या संघातील 8 खेळाडूंच्या जागी नव्या चेहऱ्यांना सेहवागने निवडले आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 08:34 AM IST

World Cup : सेहवागने निवडला भारतीय संघ, कर्णधार कोण?

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा 15 एप्रिलला होणार आहे. या घोषणेआधीच भारताचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने 15 जणांचा संघ निवडला आहे

सेहवागने संघात ऋषभ पंत आणि विजय शंकर यांना संधी दिली आहे.

शनिवारी ट्विटरवरून सेहवागने एक फोटो शेअर केला आहे. त्यात 2015 आणि 2019 च्या वर्ल्डकप संघातील खेळाडूंची नावे शेअर केली आहेत.

Loading...

2015 मधील 7 खेळाडू 2019 च्या वर्ल्डकप संघासाठी त्याने निवडले आहेत.

सेहवागच्या संघात शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार हे गेल्या वर्ल्ड़कपमधील खेळाडू आहेत.

यातून सुरेश रैनाच्या जागी केदार जाधव, अजिंक्य रहाणेच्या जागी केएल राहुल, स्टुअर्ट बिन्नी ऐवजी हार्दीक पांड्याला स्थान दिलं आहे.

याशिवाय आर अश्विन आणि अक्षर पटेल यांचे नाव वगळून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलची निवड सेहवागने केली आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी विजय शंकरचे तर मोहित शर्मा आणि अंबाती रायडु यांच्याऐवजी जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंतचा समावेश सेहवागने केला आहे.

2015 मध्ये भारताचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे होते मात्र, 2019 साठी संघाचा कर्णधार कोण याबाबत सेहवागने काही स्पष्ट केलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 08:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...