ICC Test Championship : सेहवागनं केली भविष्यवाणी, 'या' संघाला मिळणार कसोटी वर्ल्ड कप जिंकण्याचा मान!

ICC Test Championship : सेहवागनं केली भविष्यवाणी, 'या' संघाला मिळणार कसोटी वर्ल्ड कप जिंकण्याचा मान!

आयसीसीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली टेस्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा 2021पर्यंत सुरू राहणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : आयसीसीच्या वतीनं टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या धर्तीवर कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्यात आली. या चॅम्पियनशिपची सुरुवात अशेस मालिकेपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून झाली. या चॅम्पियनशिपमध्ये भारतानं वेस्ट इंडिज विरोधात एक कसोटी सामना जिंकत 60 गुण मिळवले. सध्या गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान ही स्पर्धा 2021पर्यंत सुरू राहणार आहे. असे असले तरी, ही स्पर्धा जिंकणार संघ पहिल्यांदाच कसोटी चॅम्पियन होणार आहे.

भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग भारताच्या खेळी संतुष्ट असून. टेस्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा महत्त्वाचे असल्याचे मतही सेहवागनं वर्तवले आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सेहवागनं कोणता संघ टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणार हेही सांगितले. टेस्ट चॅम्पियशिपचा अंतिम सामना जून 2021मध्ये होणार आहे. त्यामुळं सेहवागनं केलेली भविष्यवाणी खरी आहे की नाही हे 2 वर्षांनी कळेल.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सेहवागनं, “दोन वर्षांच्या काळात बरेच सामना खेळावे लागणार आहेत. सध्या भारतीय संघ संतुलित वाटतं आहे. दोन वर्षांचा कालावधी मोठा असतो. मात्र, भारतीय संघ सुरक्षित हातात आहे. रवि शास्त्री आणि विराट कोहली हे प्रत्येक सामना जिंकण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतील”, असे सांगितले. तसेच, “भारत हा चांगला संघ असून, आपल्याकडे चांगले फलंदाज आहेत. जलद गोलंदाजही आहेत. तेवढेच चांगले फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळं संघ सध्या संतुलित आहे. हाच संघ भारताला टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून देऊ शकतो”, असेही मत व्यक्त केले.

वाचा-दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीला डच्चू? ऋषभ पंतचे स्थानही धोक्यात

गुणतालिकेत सध्या टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्या खात्यातील गुणांची संख्या समसमान आहे. पण, भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवून अव्वल स्थान पटकावले. तर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचे 60-60 गुण आहेत. तर, या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया व इंग्लंड प्रत्येकी 32 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत.

असे आहेत टेस्ट चॅम्पियनशीपचे नियम

या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका 2 ते 5 सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला 120 गुण मिळणार आहेत. दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाही. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 20-20 गुण, तर बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी 30-30 गुण दिले जातील. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी संघाला 40 गुण मिळतील. अनिर्णित व बरोबरीच्या निकालांसाठी दोन्ही संघांना प्रत्येकी अनुक्रमे 13.3 व 20 गुण दिले जातील. 4 सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 30 गुण घेईल, तर अनिर्णित निकालासाठी 10 व बरोबरीच्या निकालासाठी 15 गुण मिळतील. पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 24, अनिर्णित निकाल 8 आणि बरोबरीच्या निकालासाठी 12 गुण मिळतील.

वाचा-दुसरा कसोटी सामना भारतासाठी महत्त्वाचा, पण झाला आहे एक बदल!

हे संघ घेणार भाग

भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूजीलँड हे संघ भाग घेतील. झिम्बाब्वे संघाला आयसीसीने निलंबित केल्यामुळे ते या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीत.

टेस्ट चॅम्पियनसाठी असे आहेत निकष

या स्पर्धेअंती ज्या दोन संघांकडे जास्त गुण असतील ते संघ 2021मध्ये इंग्लंडमध्ये अंतिम सामना खेळतील. अंतिम सामना जिंकणारा संघ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात पहिले टेस्ट वर्ल्ड कप विजेतेपद मिळवेल.

वाचा-Sorry मानसी! एका पायावर गोल्ड मिळवूनही आम्ही तुझी दखल घेण्यास कमी पडलो

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 28, 2019, 6:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading