IPL 2019 : सेहवाग म्हणतो...धोनीवर 2-3 सामन्यांची बंदी हवी होती !

आयपीएलनंही धोनीच्या या वागणुकीवर कारवाई करत, त्याच्या मानधनातली 50 टक्के रक्कम कापूनही घेतली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 10:40 PM IST

IPL 2019 : सेहवाग म्हणतो...धोनीवर 2-3 सामन्यांची बंदी हवी होती !

चेन्नई, 13 एप्रिल : आयपीएलच्या या हंगामात एका पेक्षा एक असे वाद होत आहेत. पण क्रिकेट चाहत्यांना खर अवाक केलं ते, महेंद्रसिंग धोनीनं. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं, नो बॉलवरून पंचांशी भिडला. त्यामुळं कॅप्टन कुल धोनीचं एक वेगळं रुप चाहत्यांना पाहायला मिळालं.

दरम्यान, धोनीच्या या वागणुकीवर चाहत्यांनी धोनीचं समर्थन केलं तर, अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. तर, आयपीएलनंही धोनीच्या या वागणुकीवर कारवाई करत, त्याच्या मानधनातली 50 टक्के रक्कम कापूनही घेतली. मात्र भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागच्या मते , धोनी स्वस्तात सुटला. त्याच्यावर याहून मोठी कारवाई अपेक्षित होती.एका इंग्रजी क्रिडा वेबसाईटशी बोलताना सेहवागनं, धोनीवर किमान 2-3 सामन्यांची बंदी घालणं गरजेचं होतं, असे सांगितले. तर, धोनी भारतीय संघासाठी असं भांडला असता तर मी त्याची तारीफ केली असती. भारतीय संघासाठी त्याचं हे असं रुप मी कधीच पाहिलं नाही. त्यामुळंच त्याला कॅप्टन कुल म्हणतात. पण आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघासाठी तो जरा भावूक झाला, असं मत व्यक्त केलं.

Loading...

या घडीला आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने धोनीच्या कृत्याची दखल घेत त्याच्या मानधनातली 50 टक्के रक्कम कापली आहे.

तर दुसरीकडं या प्रकरणी भारताचा माजी कर्णधार सौगव गांगुलीनं धोनीची बाजू घेत, धोनीनं जे काही केलं ते एक कर्णधार म्हणून सहाजिक होतं. आपण सर्व माणूस आहोत, असे मत व्यक्त करताना दादाने धोनीची पाठराखण केली. तसेच, आपण सर्व माणूस आहोत. तो एक उत्तम प्रतिस्पर्धक आहे आणि हीच गोष्ट उल्लेखनीय आहे. असंही गांगुली म्हणाला .

का भडकला धोनी?

राजस्थान आणि चेन्नई विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी कमाल केली. मात्र चेन्नईकडून रायडू आणि धोनी यांनी केलेली 95 धावांची भागीदारी मॅच विनिंग ठरली. दरम्यान शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता होती. या ओव्हरच्या या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जडेजानं सिक्स मारला तर, दुसरा नो बॉल होता. तिसऱ्या बॉलवर मात्र बेननं धोनीची विकेट घेतली. मात्र या ओव्हरचा चौथा बॉल वादग्रस्त ठरला.मात्र उल्हास गंधे यांनी नो-बॉलचा दिलेला इशारा हा सर्वांच्या नजरेस पडला होता, तरीही पंचांनी आपला हा निर्णय मागे घेतला. नेमक्या याच मुद्द्यावर आक्षेप घेत धोनीने मैदानात येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी धोनीच थेट मैदानात उतरला आणि अम्पायरशी भिडला. त्यामुळं हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला.VIDEO : तरुणासोबत पळून गेली होती तरुणी, खांद्यावर पतीला बसवून काढली गावकऱ्यांनी धींड


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 13, 2019 09:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...