Pulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार

Pulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार

दहशतवादी हल्ल्यानंतर विरेंद्र सेहवाग म्हणाला होता, सुधर जाओ वरना सुधार देंगे

  • Share this:

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना प्रत्येकाने त्यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. आता भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागनेही ट्विट करत शहीदांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं म्हटलं आहे.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आपण कितीही मदत केली तरी ती अपुरी असेल. मी शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतो. त्यांच्या मुलांना माझ्या सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण देईन. जवानांना अशी श्रद्धांजली वाहणं हे माझं भाग्य असेल.. असं टि्वट सेहवागले केलं आहे.दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिक संतप्त झाला आहे. शहिदांना श्रद्धांजली वाहताना दहशतवाद्यांना कठोर शब्दांत इशारा दिला जात आहे. विरेंद्र सेहवागनेही हल्ल्यानंतर ट्विट करताना भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत असे म्हणत 'सुधर जाओ वरना सुधार देंगे' असं टि्वट केलं आहे.
याआधी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने शहीदांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातीलही दोन जवानांचा समावेश आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सरकारच्या वतीने 50 लाख रुपयांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शहिदाच्या कुटुंबीयाला 1 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी IED द्वारे आत्मघातकी हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2019 02:50 PM IST

ताज्या बातम्या