मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: सेहवागच्या परीक्षेत ऋषभ पंत नापास! 10 पैकी दिले फक्त 'इतके' मार्क्स

IPL 2021: सेहवागच्या परीक्षेत ऋषभ पंत नापास! 10 पैकी दिले फक्त 'इतके' मार्क्स

Sehwag Unimpressed With Rishabh Pant's Captaincy: आपल्या टीममधल्या बॉलर्सचा योग्य उपयोग करून न घेतल्याची टीका भारतीय टीममधला माजी ओपनर क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने ऋषभ पंतवर केली आहे.

नवी दिल्ली, 28 एप्रिल: इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2021) टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी (27 एप्रिल) झालेल्या चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू टीमकडून अवघ्या एका रनने पराभूत झाली. ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) धुरा असून, विराट कोहली (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bengaluru) या टीमचं नेतृत्व करतो आहे. दिल्ली कॅपिटल्स टीमचा यंदाच्या आयपीएलमधला हा दुसरा पराभव आहे. कालच्या सामन्यात डावखुऱ्या ऋषभ पंत आणि शिम्रॉन हेटमायर या दोघांनी अर्धशतकं केली; मात्र ती त्यांच्या टीमला विजयाप्रत नेऊ शकली नाहीत. दरम्यान, आपल्या टीममधल्या बॉलर्सचा योग्य उपयोग करून न घेतल्याची टीका भारतीय टीममधला माजी ओपनर क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने ऋषभ पंतवर केली आहे. त्याच्या कॅप्टन्सीला (Captaincy) सेहवागने 10 पैकी फक्त तीन मार्क दिले आहेत.

'मी त्याला त्याच्या कॅप्टन्सीसाठी 10पैकी पाच मार्क्सही देणार नाही. कारण तुम्ही अशा चुका करूच शकत नाही. तुमचा मुख्य बॉलर (Bowler) बॉलिंगसाठी उपलब्ध नसेल, तर तुमची गणितं चुकतात. कॅप्टन्सी म्हणजे हेच सगळं काही आहे. अशा गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कॅप्टनने आपल्या बॉलर्सचा परिस्थितीनुसार योग्य पद्धतीने वापर करून घेतला पाहिजे,' असं सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला.

'तुला हे शिकण्याची गरज आहे. नाहीतर तुम्ही तुम्हाला हवा त्याला बॉल देता. कॅप्टनची क्षमता तो खेळ कसा फिरवतो यावरून ठरवली जाते. परिस्थितीनुसार त्याने बॉलिंगमध्ये किंवा फिल्डिंगमध्ये बदल करण्याची गरज असते,' असं सेहवागने सांगितलं.

(हे वाचा-चेन्नई- हैदराबादच्या 2 खेळाडूंमध्ये 3D टशन, जुन्या वादाचे उमटणार मैदानात पडसाद)

'ऋषभ पंतला चांगला कॅप्टन व्हायचं असेल, तर त्याने ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. स्मार्ट क्रिकेट खेळलास, तरच तू स्मार्ट कॅप्टन बनशील,' असा सल्लाही सेहवागने दिला.

दरम्यान, आशिष नेहराने (Ashish Nehra) ऋषभ पंतची बॅटिंग फारच संथ असल्याची टीका केली. 'मधल्या ओव्हर्समध्ये ऋषभने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये जेवढ्या रन्स सोडल्या, ते पाहता स्ट्रॅटेजी योग्य नव्हती असंच म्हणावं लागेल. शिम्रॉन हेटमायरची विकेट लवकर गेली असती, तर दिल्ली कॅपिटल्स संघाचा 25 रन्सनी पराभव झाला असता,' असं नेहरा म्हणाला.

'लक्ष्य कशा पद्धतीने गाठायचं याचं नियोजन दिल्ली टीमकडून चांगलं झालं नाही. दोन सेट झालेले बॅट्समन नाबाद राहून परत येतात आणि टीम एका रनने हरते, असं या प्रकारच्या खेळात होता कामा नये,' असं मतही नेहराने व्यक्त केलं.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Rishabh pant, Sports, Virender sehwag