'विरू' इज बॅक, सेहवागची डोपिंग समितीत निवड

'विरू' इज बॅक, सेहवागची डोपिंग समितीत निवड

विरेंद्र सेहवाग आणि दिल्लीचे माजी खेळाडू विनय लांबा यांची डोपिंग समिती (एडीएपी)त निवड करण्यात आलीये.

  • Share this:

09 नोव्हेंबर : टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा मैदानात एंट्री घेतलीये. विरेंद्र सेहवाग आणि दिल्लीचे माजी खेळाडू विनय लांबा यांची डोपिंग समिती (एडीएपी)त निवड करण्यात आलीये.

सेहवाग आणि दिल्लीकडून  1967 पासून ते 1981 पर्यंत 76 प्रथम वर्गात मॅच खेळणारे लांबा यांची एडीएपीच्या सदस्य समितीत निवड करण्यात आलीये. या व्यतिरिक्त अॅडव्हॅकेट विभा दत्ता मखिजा, डाॅ. नवीन डांग आणि हर्ष महाजन यांचा समावेश असणार आहे.

नाडाने या व्यतिरिक्त डोपिंगमध्ये दोषी राहिलेली पूर्व वेटलिफ्टर कुंजारानी देवीला एडीडीपीचं सदस्य दिलंय. कुंजारानीला 2001 मध्ये  दक्षिण कोरियमध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये शक्तिवर्धक गोळ्या घेण्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं.

आता एडीडीपीमध्ये सामिल झाल्यामुळे कुंजारानी खेळाडूंना दोषी ठरवणार आहे. कुंजारानीसह बाॅक्सर अखिल कुमार, अॅथलिट रीत अब्राहम, हाॅकीपटू जगबीर सिंह आणि टेनिसपटू रोहित राजपाल यांचा समावेश करण्यात आलाय.

एडीडीपीचे अध्यक्ष सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायालयाचे जज कुलदीप सिंह असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 12:01 AM IST

ताज्या बातम्या