मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /माणुसकी जिंदाबाद! बायकरने रिक्षावाल्याला केलेली मदत पाहून सेहवाग खुश

माणुसकी जिंदाबाद! बायकरने रिक्षावाल्याला केलेली मदत पाहून सेहवाग खुश

भारतीय टीमचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट आणि व्हिडीओ तो स्वत:च्या अकाऊंटवरून शेयर करत असतो.

भारतीय टीमचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट आणि व्हिडीओ तो स्वत:च्या अकाऊंटवरून शेयर करत असतो.

भारतीय टीमचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट आणि व्हिडीओ तो स्वत:च्या अकाऊंटवरून शेयर करत असतो.

  नवी दिल्ली, 8 जानेवारी : भारतीय टीमचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट आणि व्हिडीओ तो स्वत:च्या अकाऊंटवरून शेयर करत असतो. अनेक मजेशीर व्हिडीओ अपलोड करण्याबरोबरच काही सामाजिक व्हिडीओ देखील सेहवाग पोस्ट करतो. त्याच्या गमतीदार स्वभावामुळे आणि त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी असल्याने हे व्हिडीओ वेगाने व्हायरल होतात.

  मागच्या वर्षात कोरोनाने पूर्ण जगाला वेढलेले होते. या काळात अनेकांना मदतीची गरज होती. या काळात काही व्यक्तींनी गरजू लोकांना मदत देखील केली. यामध्ये परदेशात चष्मा खरेदी करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने केलेली 500 डॉलरची मदत असो किंवा टिप म्हणून हॉटेलमधील वेटरना 2020 डॉलरची मदत असो. या घटनांनी आजही माणुसकी जिवंत असल्याचे दिसून आले.

  वीरेंद्र सेहवाग यानेदेखील अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार एका तीनचाकी हातगाडीवाल्याला मदत करताना दिसून येत आहे. वीरेंद्र सेहवागने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

  सेहवागने हा व्हिडीओ शेअर करत याला कॅप्शनही तसंच दिलं आहे. या कॅप्शनमध्ये त्याने, 'माणुसकी जिंदाबाद... दुचाकीस्वाराने एका जोडप्याला वस्तूंनी भरलेली रिक्षा ओढताना पाहिलं. यानंतर दुचाकीस्वाराने महिलेला रिक्षात बसण्यास सांगितलं आणि त्याने बाइक चालवत रिक्षाला धक्का देत मुख्य रस्त्यावर सोडलं, असं सेहवागने लिहिलं आहे.

  सेहवागने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याला आतापर्यंत 2.3 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून 28 हजार जणांनी त्याची ही पोस्ट लाईक केली आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील एनसीआरमधील असल्याचं सांगितलं जात आहे. NCR Bikerz नावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वत:ला Rammy Ryder म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने जेव्हा या जोडप्याला रिक्षा ओढताना पाहिलं तेव्हा त्याने मदतीसाठी पुढाकार घेतला. त्याने महिलेला रिक्षात बसण्यास सांगितले आणि बाइक चालवत पायानी ढकलून रिक्षाला धक्का दिला.

  या व्हिडिओवर अनेक जणांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने तो आणि त्याचे मित्र देखील अशाच पद्धतीने मदत करत असल्याचे म्हटले आहे. तर एकाने पुलावर अशा पद्धतीने मदत करणे बरोबर नाही, यामुळे इतर वाहनांना धोका असल्याचे देखील म्हटलं आहे. याचबरोबर एकाने या बाइकरच्या मदतीमागील हेतूवर शंका घेतली आहे. 'बायकर हेल्मेटवर छोटासा GoPro कॅमेरा लावून त्यांचा प्रवास शूट करतात. तशाच कॅमेरातून हा व्हिडिओ शूट केला आहे असं दिसतंय, त्यामुळे Go PRO कॅमेरातून शूटिंग सुरू असल्यावर प्रत्येक बाईकर आपण मदत करतो', अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

  First published: