‘4 दिवसांचा कसोटी सामना आणि डायपर...’, दिग्गज क्रिकेटपटूनं ICCला केले ट्रोल

ICCने 5 दिवसांऐवजी 4 दिवस कसोटी सामना करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला दिग्गज क्रिकेटपटूंनी केला विरोध.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : कसोटी क्रिकेटला रोमांचक करण्यासाठी आयसीसीच्या वतीनं विविध नियम अंमलात आणले जात आहेत. मात्र आयसीसी एक धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. येत्या काही वर्षात कसोटी सामन्यांचे दिवस कमी करण्याचा निर्णय आयसीसी घेऊ शकतो. मात्र आयसीसीचा या निर्णय खेळाडूंना मान्य नाही आहे. एवढेच नाही तर माजी क्रिकेटपटूंनीही या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबतच भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही आयसीसीच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात सेहवागनं ‘डायपर आणि 5 दिवसांचा कसोटी सामना तेव्हाच बदलला पाहिजे जेव्हा ते खराब झाले असेल’, असे धक्कादायक विधान करत आयसीसीला ट्रोल केले. रविवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सेहवागने कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पाठिंबा दर्शविलेल्या या नियमाला विरोधात दर्शवला.

वाचा-IPLआधीच कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूवर बंदी!

बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यात सातव्या मन्सूर अली खान पटौडी व्याख्यानमालेला संबोधित करताना वीरेंद्र सेहवागनं हे वक्तव्य केले. तसेच,"मी नेहमीच बदलाचे समर्थन करतो. पहिल्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मी भारतीय संघाचा कर्णधार केला, ज्याचा मला अभिमान आहे. मी भारताच्या टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा भाग होतो. मात्र पाच दिवसीय कसोटी सामना रोमान्ससारखा आहे", असे सांगत चार दिवसांचा कसोटी सामना हा चार दिवसांच्या चांदनी सारखा आहे, असे मजेशीर वक्तव्य केले.

वाचा-ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाआधी टीम इंडियाला झटका, रोहित शर्मा जखमी!

‘बदल ठीक आहे, परंतु आत्म्यास तोडू नका’

सेहवाग आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाला की, "कसोटी जर्सीवरील क्रमांक व नावाच्या व्यतिरिक्त गुलाबी बॉल टेस्ट (डे नाईट टेस्ट) सारखे बदल चांगले आहे, परंतु जेव्हा बाळाचे डायपर आणि कसोटी सामने तेव्हाच बदलले पाहिजे जेव्हा ते खराब होतील. जे पुन्हा वापरता येणार नाही. कसोटी क्रिकेट हा 143 वर्षांचा तंदुरुस्त माणूस आहे. तो एक आत्मा आहे. चार दिवस फक्त चांदणी असते...कसोटी क्रिकेट नाही", असेही म्हणाला.

वाचा-सचिनचा आदर्श पण फलंदाजी धोनीसारखी, 16 व्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये खेळणार

असा आहे आयसीसीचा नवा नियम

2023 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 5 दिवसांऐवजी 4 दिवस कसोटी सामना करण्याचा निर्णय घेतला होता. आता आयसीसी क्रिकेट समिती या प्रस्तावावर पुनर्विचार करेल. कसोटी क्रिकेट कमी करण्यामागे आयसीसीचे उद्दीष्ट होते की कॅलेंडर वर्षात या वेळेची बचत होईल, ज्यामध्ये काही नवीन कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. तथापि, काही क्रिकेट मंडळे त्याचे समर्थन करतात, तर बीसीसीआय अद्याप त्यावर भाष्य करण्यास टाळाटाळ करत आहे.

वाचा-क्रिकेट खेळण्यासाठी व्हावं लागलं होतं 'मुलगा', आता 15व्या वर्षी खेळणार वर्ल्ड कप

कसोटी सामन्यांच्या संख्येत होणार वाढ

जर कसोटी सामने चार दिवसांचे असतील आणि 2015 ते 2023च्या क्रिकेट वेळापत्रकानुसार सामने झाल्यास इतर क्रिकेट बोर्डाकडे 335 शिल्लक राहतील. या शिल्लक दिवसांमध्ये आणखी कसोटी सामने खेळले जाऊ शकतात. तसे, जर कसोटी सामने 4 दिवस केले तर एका दिवसात 90 ऐवजी 98 षटके टाकली जातील. मुख्य म्हणजे 2018पासून आतापर्यंत 60 टक्के सामने हे चार दिवसांआधीच संपले आहेत. त्यामुळंचे आयसीसीच्या वतीनं हा विचार करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 13, 2020 02:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading