मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सेहवागने शेयर केला PHOTO, या क्रिकेटपटूला ओळखलंत का?

सेहवागने शेयर केला PHOTO, या क्रिकेटपटूला ओळखलंत का?

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा त्याच्या हटके पोस्टमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. टीम इंडियाचा टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही सेहवागने त्याच्या नेहमीच्या शैलीत दिल्या.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 6 जून : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा त्याच्या हटके पोस्टमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. टीम इंडियाचा टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही सेहवागने त्याच्या नेहमीच्या शैलीत दिल्या. सेहवागने अजिंक्य रहाणेचा लहानपणाचा एक फोटो शेयर केला. या फोटोमध्ये रहाणे कराटे खेळण्यासाठी वापरले जाणारे कपडे आणि ब्लॅक बेल्ट घालून दिसत आहे.

'कराटे खेळणारा तो मुलगा आम्हाला ऑस्ट्रेलियात दिसला. ऍडलेडमध्ये टीम 36 रनवर ऑल आऊट झाली, त्यानंतर तू पुढे येऊन टीमचं नेतृत्व केलंस आणि भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. ही आठवण कायमच प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनात राहिल. वाढदिवसाच्या शुभेच्छा,' असं ट्वीट सेहवागने केलं.

अजिंक्यने 33 वर्षांचा पूर्ण होऊन 34 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मागचं संपूर्ण वर्ष अजिंक्य रहाणेसाठी अत्यंत खास राहिलं. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्यच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात (India vs Australia) ऐतिहासिक टेस्ट सीरिज विजय मिळवला. टीम 36 रनवर ऑलआऊट झाल्यानंतर पुढच्याच टेस्टमध्ये अजिंक्यने धमाकेदार शतक केलं आणि भारताला पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आणलं.

विराट कोहली पितृत्वाच्या रजेनिमित्त घरी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) टीम इंडियाचं नेतृत्व केलं. मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये अजिंक्यने शतक करत, टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. तर सिडनीमधली टेस्ट टीम इंडियाने ड्रॉ केली. यानंतर ब्रिस्बेनमध्ये भारताने विजय मिळवत टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्येही भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत पराभव केल्यामुळे टीम इंडियासाठी हा विजय अत्यंत खास होता.

First published:

Tags: Ajinkya rahane, Cricket news, Virender sehwag