टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी वीरेंद्र सेहवागची निवड निश्चित ?

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी वीरेंद्र सेहवागची निवड निश्चित ?

चॅम्पियन्स ट्राॅफीनंतर अनिल कुंबळे राजीनामा देण्याची शक्यता आहे.

  • Share this:

01 जून : भारतीय टीमच्या प्रशिक्षकपदी विरेंद्र सेहवागची निवड जवळपास निश्चित झालीये. बीसीसीआयने याबाबत सेहवागला होकार कळवला असून त्यानंतर सेहवागने प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे चॅम्पियन्स ट्राॅफीनंतर अनिल कुंबळे राजीनामा देण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात वाद सुरू आहे. त्यातच चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यासाठी बीसीआयच्या अधिकाऱ्यांचा नकार असतानाही कुंबळेंनी आग्रह केला. एवढंच नाहीतर कुंबळेंनी आपल्या मानधनात 20 टक्के वाढ करून मागितली. त्यामुळे बीसीसीआय कुंबळेंवर नाराज झालं आणि बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला. यासाठी बीसीसीआयने वीरेंद्र सेहवागकडे प्रस्ताव पाठवला. बीसीसीआयकडून हमी मिळाल्यानंतर सेहवागने आपला अर्ज दाखल केलाय.

भारतीय टीमच्या प्रशिक्षकपदासाठी सेहवाग वगळता अनिल कुंबळेंसह लालचंद राजपूत, डोडा गणेश, दक्षिण आफ्रिकेचे रिचर्ड पाॅयबस आणि आॅस्ट्रेलियन टाॅम मुडी यांनी अर्ज केला आहे. लालचंद राजपूत आणि टाॅम मुडीने दुसऱ्यांदा अर्ज केलाय.

विराट कोहली आणि कुंबळेंमध्ये काय आहे वाद ?

आॅस्ट्रेलियाच्या विरुद्ध धर्मशाळा कसोटी मालिकेत विराट कोहली अनफिट असल्यामुळे कुंबळेंनी कुलदीप यादवला संधी दिली होती. तेव्हापासून विराट कोहली आणि अनिल कुंबळेंमध्ये धुसफूस सुरू आहे. विशेष म्हणजे, मॅच संपल्यानंतर विराटने पत्रकार परिषदेत रहाणे आणि कुंबळेंचं तोंडभरून कौतुक केलं होतं. पण, आता कुंबळेंच्या निर्णयावर कोहली नाराज होता हे  उघड झालंय. विराट आणि कुंबळेतल्या वाद शमवण्यासाठी सचिन तेंडुलकरने मध्यस्थी केली पण फारसा फरक पडला नाही.

First published: June 1, 2017, 11:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading